कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालय, शिवाजी स्टेडियमलगत असणाऱ्या महापालिकेच्या मुतारीची रविवारी रात्री उशिरा पडझड झाली. शहरात अशाप्रकारे नेमके कोण मुतारी पाडत आहेत, असा प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोमवारी दिवसभर व्हायरल झाला. महापालिकेकडे माहिती घेतली असता मुतारी कोणी पाडली नसून शेजारीच असणाऱ्या कंटेनरमधील कचरा उठाव करताना आर.सी. गाडी मागे येताना झालेल्या धडकेमुळे पडल्याचे समोर आले आहे.
शहरात कचरा कोंडाळा आणि मुतारी असली पाहिजे. मात्र, आमच्या घराजवळ नको, अशी भावना सर्वांची असते. यामुळे महापालिकेने काही बांधलेल्या मुतारी पाडण्याचे प्रकार हाेत आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसरातील मुतारीही कोणी तरी पाडली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, महापालिकेने चौकशी केली असता महापालिकेच्याच कचरा उठाव करणाऱ्या आर.सी. गाडीच्या धडकेमुळे पडल्याचे समोर आले. महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांनी उपशहर अभियंता बाबूराव दाबडे यांना मुतारीचे बांधकाम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
फोटो : ०५०१२०२० कोल केएमटीस मुतारी न्यूज
ओळी : कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले येथील महापालिकेची मुतारीची आर.सी. गाडीच्या धडकेमुळे पडझड झाली आहे.