शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’ प्रकल्पांसाठी मुश्रीफ यांचा ठिय्या : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:59 IST

जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या

ठळक मुद्देकुपेकरांसह इतर आमदारांकडूनही सरकारचा निषेधमुश्रीफ व कुपेकर यांच्या या मागणीला कॉँग्रेस व राष्टवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या मारत सरकारचा निषेध व्यक्त केला. मुश्रीफ व कुपेकर यांच्या या मागणीला कॉँग्रेस व राष्टवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला.

‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे बहुतांशी म्हणजेच ९० टक्के काम राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले आहे. नागनवाडी प्रकल्पाचे कामही ७० टक्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उचंगी प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. त्यानंतर आलेल्या युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधीच्या उपलब्धतेसह प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या बदल्यात हेक्टरी ३६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्यानुसार निधीची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी केली.डिजिटल फलक लक्षवेधी ठरला....विधानभवनाच्या पायºयांंवर मुश्रीफ, कुपेकर यांनी हातात डिजिटल फलक घेऊन सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘जिव्हाळ्याचे प्रकल्प रखडले...मग निधी वळविला कुणीकडे?’, ‘ हक्काच्या १२ टीएमसीपैकी एक थेंबही पाणी अडविता आला नाही, ही कसली कर्तबगारी?’ असे लिहिलेला फलक लक्ष वेधत होता.कागल व चंदगड मतदारसंघातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना तातडीने निधी द्या, या मागणीसाठी सोमवारी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विधानभवनाच्या पायºयांवर आंदोलन केले. यावेळी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे आमदार उपस्थित होते.  

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर