शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पवार-राजनाथसिंह कलगीतुऱ्यावर मुश्रीफ यांचे मौन, पण चंद्रकांतदादांना दिला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:45 IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकार’संदर्भातील कलगीतुºयाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीप्पणीबद्दल प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिला, पण चंद्रकांतदादांना सल्ला दिला.

ठळक मुद्देपवार-राजनाथसिंह कलगीतुऱ्यावर मुश्रीफ यांचे मौन चंद्रकांतदादांना दिला सल्ला

गडहिंग्लज : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकार’संदर्भातील कलगीतुऱ्याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीप्पणीबद्दल प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिला, पण चंद्रकांतदादांना सल्ला दिला.गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात आयोजित बैठकीसाठी त्यांनी आज (गुरूवारी) पत्रकारांशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांनी वाढदिनीतरी कांही बोलायला नको होते..! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा बुधवारी (१०) वाढदिवस झाला. मीदेखील फोनवरून त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, त्यांनी किमान वाढदिनीतरी राजकीय भाष्य करायला नको होते.वाढदिवस हा चांगला संकल्प करण्याचा, चांगले कांही केले असेल तर सांगण्याचा दिवस असतो. वाढदिनी त्यांनी राज्यातील आघाडी सरकारविषयी पवार व राजनाथसिंह यांच्या वक्तव्याविषयी भाष्य केले. या विषयावर मी कांहीच बोलणार नाही. परंतु, परमेश्वराने आम्हाला सत्तेची संधी दिली आहे.त्याचा पुरेपुर वापर जनतेच्या भल्यासाठी, लोक कल्याणासाठीच करू. आम्ही असे काम करून दाखवू की, जनता आमचे काम आयुष्यभर विसरणार नाही, असेही मुश्रीफ यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर