शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:52 IST

महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ही त्यांची धडपड आ बैल मुझे मार या वृत्तीची असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देमुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार", चंद्रकांत पाटील यांचा टोला निष्ठा दाखविण्याची केविलवाणी धडपड

कोल्हापूर : महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ही त्यांची धडपड आ बैल मुझे मार या वृत्तीची असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.राज्य सरकारमधील बदल्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची टीका पाटील यांनी केली होती.त्यावर मुश्रीफ यांनी सौ चुहे खाके.. अशी टीका मुश्रीफ यांनी केली.त्यास चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणतात, आमचे सरकार असताना २०१४ ते २०१९ मध्ये बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर त्यावेळी तुम्ही काय झोपा काढत होतात का..?

इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा आधी २०२० मधील बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला झोंबंत कशाला.. ? आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही असे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांनी म्हटले आहे, मी नव्हे. ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण अशा सगळ्या विषयांमध्ये न्यायालयाकडून थपडा खायच्या असतील तर कोण काय करणार ?सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वबच्या अहवालामध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमातून येत असताना त्याबाबत मुश्रीफ काहीही बोलत नाहीत पण सरकार विरोधी घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी ..... असे म्हणण्यातला प्रकार आहे असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे..

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर