शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफांचीही चहापानास हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:49 IST

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महाडिक यांनी त्यांचा पाहुणचार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ...

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महाडिक यांनी त्यांचा पाहुणचार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील यांची उपस्थिती होती. मात्र राष्टÑवादीचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. उलट भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची हजेरी नजरेत भरणारी होती.सकाळी अकराच्या सुमारास शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वाहनात खासदार महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील होते. सोबतच्या वाहनातून ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील हे एकत्रित आले; तर त्यापूर्वी सुनील तटकरे हे निवासस्थानी येऊन थांबले होते. यानंतर निवासस्थानी चहापान करताना पवार यांनी महाडिक कुटुंबीयांसोबत चर्चा केली. यावेळी काही काळ अनौपचारिक गप्पा झाल्या. यानंतर खासदार महाडिक यांनी पवार यांच्यासह तटकरे, मुश्रीफ, के. पी. पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आमदार कुपेकर यांचेही स्वागत अरूंधती महाडिक यांनी केले. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीच्या महिला नगरसेवकांनी पवार यांची एकत्रित सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नगरसेवक आशिष ढवळे, किरण नकाते, राजसिंह शेळके, विलास वास्कर, शेखर कुसाळे, गीता गुरव, अर्चना पागर, सुनंदा मोहिते, भाग्यश्री शेटके, कविता माने, सविता घोरपडे, रूपाराणी निकम, उमा इंगळे, आदी उपस्थित होते.जिल्हा बॅँकेतील जुन्या नोटांसंदर्भात जेटलींशी चर्चा कराशरद पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या कामकाजाविषयी मुश्रीफ यांना विचारले. यावर मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळातील जुन्या नोटा काही प्रमाणात अद्याप बॅँकेकडे शिल्लक आहेत. त्या बदलून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चर्चा करावी, अशी विनंती केली. यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मुश्रीफांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्यागेल्या काही दिवसांपासून खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौºयात ते एकत्र दिसणार का अशी चर्चा होती; परंतु रविवारी सकाळपासून पवार यांच्या दौºयात ते पवार यांच्या वाहनातून एकत्रच होते. विशेष म्हणजे महाडिकांच्या निवासस्थानी आयोजित चहापान कार्यक्रमालाही मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.