शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मस्कतचा डीडी’ उद्यापर्यंत

By admin | Updated: November 1, 2015 00:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा : पाठविल्याचे पत्र प्रशासनास प्राप्त

कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील कै. नितीश पाटील यांच्या अपघाती मृत्यूनंतर मस्कत प्रशासनाने पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा नवीन डिमांड ड्राफ्ट (डीडी) पोस्ट विभागाच्या प्रक्रियेत आहे. तो उद्या, सोमवारपर्यंत येईल अशी शक्यता जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी वर्तविली आहे. मस्कत प्रशासनाकडून ‘डीडी’ पाठविल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला यापूर्वी प्राप्त झाले आहे. हे प्रकरण जिल्ह्यात खूप गाजले होते. पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांचा मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाखांच्या डिमांड ड्राफ्ट (डीडी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला होता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मस्कत प्रशासन, तेथील भारतीय राजदूतावास यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. विशेषत: जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला. अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पत्रव्यवहारानंतर शहानिशा झाल्यावर मस्कत प्रशासनाने नवीन ‘डीडी’ १९ आॅक्टोबरला पाठविला आहे, त्या संदर्भात पत्रही त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहे. हा ‘डीडी’ पोस्टाकडून जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. अद्याप तो पोस्टाकडेच आहे. उद्या, सोमवारपर्यंत तो येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी मिळालेला ‘डीडी’ मस्कत प्रशासनाकडून पाठविल्यानंतर तो पंधराव्या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या आधारावरच तो सोमवारपर्यंत येतो की काय? असा कयास बांधला जात आहे. (प्रतिनिधी) अतिरिक्त जिल्हाधिकारी बेफिकीर ‘डीडी’ केव्हा मिळणार या संदर्भात विचारणा करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नेहमीप्रमाणे त्यांच्या मोबाईलच्या रिंग होतात; परंतु पलीकडून तो उचलला जात नसल्याचा प्रत्यय पुन्हा आला. यावरून ते या प्रकरणात किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. प्रकरण चांगलेच तापल्याने कै. नितीश यांच्या नातेवाइकांची गोड बोलून बोळवण करणे एवढेच त्यांच्याकडून आतापर्यंत झाले आहे.