मुरगूड नगरपरिषदेला तालुका स्तरीय समिती, कागल यांनी आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी लेखी सूचना व आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे रविवारी ग्रामीण रुग्णालयास मुरगूडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी भेट देऊन आरोग्य सुविधेची पाहणी केले. त्याअनुषंगाने शहरांतील सर्व हॉस्पिटल्स, दवाखाने यांनासुद्धा उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
मुरगूड नगरपरिषदेला जिल्हा अग्निशमन योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या आग प्रतिबंधक ७० फायर बॉलपैकी ५ फायर बॉल ग्रामीण रुग्णालयाला प्रदान केले. यावेळी मुरगूडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, विजय मोरबाळे, फायरमन प्रवीण देसाई, अग्निशमन चालक विनोद घुंगरे पाटील, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमोल पाटील, डॉ. पी. वाय. तारळकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
फोटो ओळ
मुरगूड, ता. कागल येथे ग्रामीण रुग्णालयात आग प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या वतीने फायर बॉल वितरित करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, आदी उपस्थित होते.