शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

चहा विक्रेत्या महिलेवर खुनी हल्ला

By admin | Updated: June 5, 2016 01:11 IST

शिये-हनुमाननगर येथील घटना : दागिन्यांची लूट; अज्ञात चौघांचे कृ त्य

कोल्हापूर : शिये जुना जकात नाका येथे चहा विक्रेत्या महिलेवर अज्ञात चौघांनी लोखंडी गजाने खुनी हल्ला करून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत पलायन केले. संगीता चंद्रकांत पोतदार (वय ४०, रा. हनुमाननगर, शिये, ता. करवीर) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, संगीता पोतदार यांची शिये जुना जकात नाका येथे चहाची टपरी आहे. दुपारी चारच्या सुमारास त्या एकट्या असताना तेथे चौघे तरुण आले. त्यांनी त्यांच्या टपरीवर अंडा आॅम्लेट खाऊन चहा पिला. पोतदार यांनी त्यांच्याकडे बिलाची मागणी करताच त्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून लोखंडी गजाने त्यांना बेदम मारहाण केली. डोक्यात, तोंडावर, पाठीवर, खांद्यावर व हातावर गंभीर वार करून त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मदतीसाठी हाक दिली. येथील वाहनधारकांसह नागरिकांनी त्यांना शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. त्यांची प्रकृ ती गंभीर असल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)