शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:20 IST

kolhapur, Police, murder गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खूनआरोपी पोलिसात हजर : निकाल विरोधात लागल्याचा मनात राग

उत्तूर : गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी परसू सावंत व संजय महादेव सावंत यांच्यात पिपळा सकल मळा नावाच्या शेतातील गट नं. ६१० (अ) मध्ये वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. त्याबाबत न्यायालयात खटला सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी (२७) सकाळी शिवाजी परसू सावंत हे सकाळी पिंपळा सकल मळा शेतात जनावरे घेवून गेले होते. यावेळी शेतीच्या बांधावरील झाडे तोडल्याचा जाब विचारला असता शिवाजी व संजय यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

यामध्ये संजयने शिवाजी यांचे छातीवर टोकदार, धारदार हत्याराने भोसकून त्यास गंभीर जखमी केले. यामध्ये शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. खून झाल्याचे समजताच शेताकडे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.मी व माझा सख्खा चुलत भाऊ शिवाजी यांच्यात मारामारी झाल्याचे सांगून आरोपी संजय हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. मात्र, संजयच्या डोक्याला व हातास मार लागल्याने पोलिसांनी त्याला उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिवाजी यांचा भाऊ पांडुरंग परसू सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोयता, टोकदार शस्त्राची नळीघटनास्थळी कोयता, टोकदार शस्त्र ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली नळी, मिरची पूड दिसून आली. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

 सव्वा एकर शेतीचा वाददोन सख्या चुलत भावांमध्ये १ एकर १४ गुंठे जमीनीसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालय आजरा, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे असलेल्या दाव्याचा निकाल संजय यांच्या बाजूने लागला. त्याविरोधात शिवाजी यांनीही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिवाजी यांच्या बाजूने लागला. हा राग मनात धरून संजय याने खून केला. वादाचा शेवट खूनजमीनसंदर्भात तंटामुक्त, पोलिस ठाणे याठिकाणी अनेकवेळा बैठका झाल्या. पण दोघांची ताठर भूमिका असल्याने वाद मिटलेला नव्हता.लाकडे कापणारे पळून गेलेशिवाजी यांनी वादग्रस्त शेतजमीनीतील लाकडे व्यापाऱ्यांना विकली होती. गेली दोन दिवस लाकूड कापणी सुरू होती. पावणेदहाच्या सुमारास शेतात खून झाल्याचे समजताच संबंधित लाकूड कापणी करणारी मंडळी भितीने पळून गेली. 

संपत्तीच्या वादातून दुसरा खून२० वर्षापूर्वी संपत्तीच्या वादातून चिमणे (ता. आजरा) येथे सख्या भावात जमिनीच्या वादातून खून झाला होता. तालुक्यातील हा दुसरा सख्या चुलत भावात झालेला खून आहे.

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस