शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिरात महापूजा

By admin | Updated: March 12, 2016 00:33 IST

अमृतमहोत्सवी सोहळ्याची सांगता : भक्तिमय वातावरण; दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मुनिसुव्रत जैन श्वेतांबर मंदिरात अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी, भक्तिमय वातावरणात महापूजा झाली. यावेळी विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती. सांगता सोहळ्यानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भगवंताच्या मूर्तीला सोन्या-चांदीने मढविण्यात आले होते. तसेच पन्नास हजार फुलांनी गाभारा सजविण्यात आला होता. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये ७५ वर्षांपूर्वी उद्घाटनावेळची मिरवणूक, कलशारोहण सोहळ्याप्रसंगी काढण्यात आलेली छायाचित्रे डिजिटल स्वरूपात मांडण्यात आली होती. दरम्यान, सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहणाचा मान मिळालेले हिंदुमलजी जितराजजी राठोड यांच्या घरातून ध्वजा मंदिरात आणण्यात आली. आचार्य श्रेयांसप्रभु सुरीश्वरजी महाराजांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले, ‘जीवनात चांगल्या कामाचा संकल्प करा. चांगले कार्य करा. जेणेकरून सर्व मानवजातीचे कल्याण होईल व आपल्यालाही सद्गती प्राप्त होईल.’सकाळी ११.३० वाजता आचार्यांच्या उपस्थितीत मंदिरावर धर्मध्वजारोहण विधी पार पडला. यावेळी ७० साधू महाराज व सुमारे दोन ते अडीच हजार श्रावक, श्राविका उपस्थित होते. यानंतर दुपारी अशोक संघवी, संजय देवीचा यांच्या हस्ते सत्तरभेदी पूजा करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल गुलाबचंद ओसवाल, संघवी भबूतमलजी, सूरतमलजी निंबजीया यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. कोल्हापुरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. संस्थानकाळात करवीरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सक्रिय पुढाकाराने १९४१ मध्ये मंदिराची उभारणी झाली. मंदिरासाठी छत्रपतींनीच जागा उपलब्ध करून दिली होती. वास्तुकलेचा अनुपम आविष्कार म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. त्याची बांधणी अतिशय कलात्मक झाली असून, मंदिराच्या अवतीभोवती विविध देवतांच्या शिल्पाकृती उभारण्यात आलेल्या आहेत. शहरात जैन समाजाची जी मंदिरे आहेत, त्यांपैकी शिखर असणारे हे एकमेव मंदिर आहे. समाजाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून सुपरिचित असलेल्या मंदिरात अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या शुक्रवार (दि. ४) पासून अष्टान्हिका जिनेंद्र महोत्सव सुरू असून, यामध्ये भव्य सामैया, श्री पंचकल्याणक पूजा, आंगी रोशनाई, कुंभस्थापना, ज्वारारोहण, नवग्रह पाटला पूजन, अढार अभिषेक पूजन, लक्ष्मीपुरी संघाची नवकारशी, श्री ४५ आगम पूजा, शोभायात्रा, वरघोडा, लघुशांतीस्नात्र पूजन असे धार्मिक विधी, कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मुंबई येथील गायक अनिल गेमावत व राजुभाई भोयणीवाला यांच्या भक्तिसंगीताचा सुश्राव्य कार्यक्रमही पार पडला. सांगता सोहळ्यानिमित्त हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार होती; परंतु काही तांत्रिक कारणास्तव ती रद्द करण्यात आली. श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टमार्फत चातुर्मास व पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, उपाध्यक्ष अभय गांधी, बिपिन परमार, उपसेक्रेटरी हिंमत संघवी, नितीन राठोड, दिलीप गांधी, प्रमोद पटनी, दिलीप संघवी, धनराज ओसवाल, कन्हैयालाल राठोड, आदींनी नियोजन केले. (प्रतिनिधी)