शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

महापालिकेच्या गाळ्याचे भाडे रेडीरेकनरप्रमाणेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:07 PM

कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यात नमूद आहे. तसेच मुदतवाढीसंदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियानुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर व गाळेधारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पाचवे कनिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी गाळेधारकांचे दावे बुधवारी गुणदोषांवर नामंजूर केले आहेत. त्यामुळे गाळेधारकांना यापुढे रेडीरेकनरवर आधारितच भाडे भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या गाळ्याचे भाडे रेडीरेकनरप्रमाणेचन्यायालयाचा निकाल : गाळेधारकांचे दावे नामंजूर

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यात नमूद आहे. तसेच मुदतवाढीसंदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियानुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर व गाळेधारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पाचवे कनिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी गाळेधारकांचे दावे बुधवारी गुणदोषांवर नामंजूर केले आहेत. त्यामुळे गाळेधारकांना यापुढे रेडीरेकनरवर आधारितच भाडे भरावे लागणार आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे शिवाजी चौक, मटण मार्केट, कपिलतीर्थ, ताराराणी चौक , लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी, शाहूपुरी गांधी मार्केट, तुळजाभवानी मार्केट, कसबा बावडा येथे ३८ मार्केट आहेत. या मार्के टमध्ये जवळपास २५०० गाळे असून त्यांपैकी बऱ्याच गाळेधारकांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे.

या गाळेधारकांची मुदत संपल्यानंतरही ते पूर्वीच्या भाड्याप्रमाणे भोगवटा करीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने पूर्वीची गाळ्यांची भाडेरक्कम अत्यंत अल्प असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार सुधारित भाडे आकारून गाळ्याच्या मुदतवाढीबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो नामंजूर झाला; परंतु आयुक्तांनी तो विखंडित करण्याकरिता शासनाकडे पाठविला. दि. २१ नोव्हेंबर २०१६ रोजी विखंडित करून शासन निर्णय पारित केला. त्यानुसार नोटिसीद्वारे गाळ्यांची रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करण्याबाबत व मुदतवाढीच्या अनुषंगाने कागदपत्राची पूर्तता करावी, असे गाळेधारकांना महापालिकेने कळविले होते.या नोटीस व भाडेवाढीसंदर्भात शिवाजी मार्के ट चप्पल लाईनच्या गाळेधारकांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांच्या न्यायालयात दावे दाखल केले होते. या दाव्यांत गाळेधारक यांनी महानगरपालिकेने गाळ्यांच्या भाड्यासंबंधी गाळेधारकांना बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी, बेकायदेशीरपणे, भरमसाट भाडेवाढ केली आहे. तसेच शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून बेकायदेशीरपणे नोटिसा लागू केल्या आहेत, अशी तक्रार करण्यात आली होती.

सदर दाव्यात महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल राऊत व अ‍ॅड. मुकुंद पवार यांनी काम पाहिले व त्यांना इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले व लिपिक सूर्यकुमार ढाले यांनी साहाय्य केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे थकीत भाडेवसुलीचा तसेच रेडीरेकनरनुसार गाळे देण्याचा महापालिकेचा कायदेशीर मार्ग माकळा झाला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर