शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पालिका तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे-- सातपुते यांची सभापतिपदी बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:25 IST

सांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या काँग्रेसच्या हाती आल्या. बुधवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्दे: प्रलंबित मिरज पाणीपुरवठा, ड्रेनेज योजना मार्गी लावूविकासकामाच्या फायली मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या काँग्रेसच्या हाती आल्या. बुधवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. महापालिका निवडणुकीपूर्वी मिरज पाणीपुरवठा योजनेसह ड्रेनेज आणि विकासकामाच्या फायली मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे सभापती सातपुते यांनी स्पष्ट केले.

सभापतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेसमध्ये मोठी चुरस होती. सातपुते यांच्यासह दिलीप पाटील, रोहिणी पाटील, किशोर लाटणे यांची नावे चर्चेत होती. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मंगळवारी सभापतिपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सातपुते यांचा सत्कार केला.

सातपुते यांना महापौर हारुण शिकलगार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर विजय घाडगे, सदस्य दिलीप पाटील, संतोष पाटील, बबिता मेंढे, संजय मेंढे, प्रशांत पाटील, प्रशांत मजलेकर, मृणाल पाटील, विशाल कलकुटगी यांनी सभापतिपदाच्या खुर्चीवर बसविले. निवडीनंतर सातपुते म्हणाले, कॉँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम,राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यामुळे मला बिनविरोध सभापतिपदाची संधी मिळाली.

यासाठी महापौर शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, अन्य पदाधिकारी, नगरसवेकांनीही प्रयत्न केले. महापालिका क्षेत्रातील अपुºया योजना, रस्ते, गटारी, आरोग्य या नागरी समस्या मार्गी लावणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थितीही सक्षम करण्यावर भर असेल.सातपुते म्हणाले, निवडणुकीत सर्वांनी साथ दिल्यामुळे साहजीकच विकासाची ही एकी आम्ही कामातून दाखवू. सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजना रखडली आहे. त्यातील अडचणी आणि त्रुटी दूर करू. ती मार्गी लावण्यासाठी जलदगती कार्यक्रम राबवू. कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू. मिरजेसाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून ११०३ कोटींची पाणी योजना मंजूर झाली आहे.महापौर-उपमहापौरांत जुंपलीसभापती निवडीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीतून आघाडीचे संकेत देण्यात आले असले तरी, काँग्रेसमधीलच उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीला मात्र वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची प्रचिती सभापती निवडीवेळी आली. नूतन सभापती सातपुते यांच्या सत्काराच्या निमित्ताने महापौर शिकलगार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. बिनविरोधला खोडा घालणारे, निवडीवरून गैरकारभाराचे आरोप करणारे, सत्तेचा बाजार करणारे आज सत्कारासाठी धावल्याचा टोला उपमहापौरांना लगाविला. यावरून उपमहापौर विजय घाडगे यांनीही, बाजार करण्याचा मार्ग तुमचा, आमचा नव्हे, असा प्रतिटोला लगावला. याची दिवसभर महापालिका वर्तुळामध्ये नगरसेवकांमध्ये चर्चा सुरु होती.