शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी आनंदाची बातमी...परीक्षा होणार नसल्या तरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:07 IST

जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज दि. २४ मार्चपासून बंद पडले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण समितीदेखील अपवाद राहिलेली नाही.

ठळक मुद्देमहापालिका शाळेतील वार्षिक परीक्षा रद्दसर्व शाळेतील शिक्षकांनी दि. १० मे पूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे आहेत.

 

सर्व विद्यार्थी उत्तीर्ण : सर्वांकष मूल्यमापनावर गुणपत्रिकाकोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळेत होणारी वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना दिल्या आहेत.

जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज दि. २४ मार्चपासून बंद पडले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण समितीदेखील अपवाद राहिलेली नाही.

महापालिका शिक्षण समितीकडील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे यावर्षीची वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीमार्फत या परीक्षा घेतल्या जात असतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली; परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. देशात दि. ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरसुद्धा परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नाही. त्यामुळे शिक्षण समितीने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन करण्यात येते. विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रुची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेऊन सर्वांकष मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये टक्केवारी ठरविली जात नाही, तर अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. आता परीक्षा रद्द केल्यामुळे ही सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. सर्व शाळेतील शिक्षकांनी दि. १० मे पूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे आहेत.शिक्षक करणार सर्वेक्षणाचे कामकोल्हापुरातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कामाकरिता तहसील कार्यालयाकडून शिक्षकांची यादी मागविली आहे. त्यानुसार २५० शिक्षकांची यादी तयार केली आहे. या शिक्षकांना ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचे काम करावे लागणार आहे.- महापालिकेच्या शाळा - ५९- विद्यार्थी संख्या - १० हजारांहून अधिक- शिक्षक व कर्मचारी संख्या - ३५०

 

प्रथम सत्रात नियोजनाप्रमाणे परीक्षा झाली; पण कोरोना संसर्गामुळे वार्षिक परीक्षा रद्द केली. एक महिना शाळांचे कामकाज झाले नाही. त्यामुळे सर्वांकष मूल्यांकनावर आधारित निकाल तयार करण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शंकर यादव, प्रशासन अधिकारी 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा