शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीने उत्तर कर्नाटकात भाजपला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:45 IST

हुबळी-धारवाड, कलबुर्गी त्रिशंकू; पण सत्ता स्थापणार : एमआयएमचा उदय कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय

ठळक मुद्देबेळगाव महापालिका हा आजपर्यंत मराठी भाषिकांचा बालेकिल्ला मानला जात होता.  त्यात भाजपने ५८ पैकी ३५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत केली.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : उत्तर कर्नाटकातील बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या तीन महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला बळ दिले आहे. बेळगावमध्ये प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर अन्य दोन महापालिकांमध्ये त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले असले तरी तेथे भाजपच सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. काॅंग्रेससाठी मात्र हा धक्का मानला जात आहे.

बेळगाव महापालिका हा आजपर्यंत मराठी भाषिकांचा बालेकिल्ला मानला जात होता.  त्यात भाजपने ५८ पैकी ३५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगतकेली.  कॉंग्रेसला १०, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४, अपक्षांना ८ आणि एमआयएमला १ जागा मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी हा फार मोठा धक्का आहे. मराठी मतांची पक्षीय राजकारणात झालेली विभागणी,  मराठी उमेदवारांची संख्या जादा असणे ही या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाची काही प्रमुख कारणे आहेत. 

हुबळी-धारवाड महापालिकेच्या ८२ सदस्यीय महापालिकेत भाजपला ३९, कॉंग्रेसला ३३, एमआयएमला ३, संयुक्त जनता दलाला १ आणि अपक्षांना ६ जागा मिळाल्या आहेत. येथे त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले असले तरी सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप तेथे सत्ता स्थापन करणार आहे. कॉंग्रेसची सदस्यसंख्याही ११ ने वाढली आहे. ही बाब आगामी काळात चिंता वाढवणारी ठरू शकते. याचवेळी एमआयमने तीन जागा जिंकत प्रथमच सभागृहात प्रवेश केला आहे. एमआयएममुळे कॉंग्रेसची मते कमी झाली आहेत.

गुलबर्ग्यात काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष

n    कलबुर्गी म्हणजेच पूर्वीच्या गुलबर्गा महापालिकेत ५५ पैकी २७ जागा जिंकून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. भाजपचे २३, संयुक्त जनता दलाचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर एक जागा अपक्षाला मिळाली. n    त्याने लगेच आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. संयुक्त जनता दलही सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी करणार आहे.

n    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही कलबुर्गीत सत्ता स्थापन करण्याचे संकेत मंगळवारी दिले आहेत.n    विशेष म्हणजे बसवराज बोम्मई मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर राज्यातल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुका होत्या. त्यामुळे बोम्मई यांच्यासाठीही एक परीक्षाच होती आणि त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक