शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

महापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:51 IST

Muncipal Corporation Election Kolhapur- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पूर्वतयारीचे निर्देश दिल्यामुळे महानगरपालिकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात होण्याची दाट शक्यता आहे. प्रारूप प्रभागरचना व आरक्षणे निश्चित झाल्यानंतर आता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महापालिकेत त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर : महापालिकेत लगबग सुरू

भारत चव्हाण कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पूर्वतयारीचे निर्देश दिल्यामुळे महानगरपालिकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात होण्याची दाट शक्यता आहे. प्रारूप प्रभागरचना व आरक्षणे निश्चित झाल्यानंतर आता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महापालिकेत त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे.महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार याची उत्सुकता ताणली गेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेचे पुढचे पाऊल म्हणून प्रारूप तसेच अंतिम मतदारयादी तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दि. १६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू होणार असून त्यानंतर साधारण एक महिन्याने म्हणजेच एप्रिलच्या १५ तारखेच्या दरम्यान निवडणूक घेतली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार आहेत. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे, आदी स्वरूपाची कार्यवाही केली जाणार नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदारयाद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.- असा आहे मतदारयादीचा कार्यक्रम -

  • दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होणार.
  •  दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
  •  दि. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.
  • दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल.
  • दि. १२ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.

राजकीय पक्षांची जोरदार तयारी-निवडणूक १५ एप्रिलच्या दरम्यान होणार हे आता स्पष्ट झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभागाचे सर्वेक्षण पूर्ण होत आले आहे. निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांचा शोधही आता पूर्ण झाला आहे. फक्त त्यांना आपल्याकडे खेचण्याची मात्र चढाओढ सुरू झाली आहे. हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारांना राजकीय पक्षाचे नेते ह्यआमची उमेदवारी घ्या, पुढचे आम्ही बघतोह्ण, असे सांगितले जात आहे.शिवसेनेचाही आता साम-दाम-दंड भेदकट्टर शिवसैनिकांची फौज, पक्षाच्या विचारधारेला बांधील असलेला मतदार असूनही शिवसेनेचे उमेदवार ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी मागे पडतात. हा गेल्या अनेक निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन यावेळी शिवसेनेने ह्यसाम-दाम-दंड-भेदह्ण या आयुधांचा वापर करण्याचे ठरविले असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी त्याचे सूतोवाच केले. राज्यात सत्ता असल्याने शिवसेनाही आता मागे राहणार नाही, असे दिसते. भाजपची भिस्त ताराराणीच्या ताकदीवरदेशात सत्तेत असणाऱ्या भाजपची ताकद कोल्हापूर शहरात तुलनेने कमी आहे. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त ही त्यांची आघाडी असलेल्या ताराराणी आघाडीच्या ताकदीवर असणार आहे. ताराराणी आघाडीसाठी महादेवराव महाडिक, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, सत्यजित कदम, सुनील कदम, तर भाजपसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, राहुल चिकोडे व्यूहरचना आखत आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख मार्गदर्शक व निवडणुकीतील रसद पुरविण्याच्या भूमिकेत आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढगेल्या दहा वर्षांपासून एकत्र असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीत सभागृहातील पहिल्या स्थानासाठी चढाओढ सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र लढायचे, पण प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करायची नाही, असे ठरवून टाकले आहे. दोन्ही पक्षांचे टीकेचे लक्ष्य हे भाजप असले तरी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे एकमेकांविरुद्धच प्रयत्न होतील, असा एकंदरीत रागरंग आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक