शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नगरसेवकाने मागितली निधीची भिक्षा-महासभेत आयुक्तांसमोर धरला कटोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:45 IST

कोल्हापूर : प्रभागात विकासकामे होत नाहीत. निधी मागितला तर तो दिला जात नाही. विकासकामांच्या फाईल घेऊन गेलो की अधिकारी ताकतुंबा करतात.

कोल्हापूर : प्रभागात विकासकामे होत नाहीत. निधी मागितला तर तो दिला जात नाही. विकासकामांच्या फाईल घेऊन गेलो की अधिकारी ताकतुंबा करतात. मग आम्ही नगरसेवकांनी जायचे तरी कोठे? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत कमलाकर भोपळे यांनी मंगळवारी हातात चक्क कटोरा धरून महानगरपालिका सर्वसाधारण सभेत आयुक्तांकडे विकासनिधीची भिक्षा मागितली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरीही क्षणभर गोंधळून गेले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.

रस्ता अपघातात दोन भावांचा मृत्यू झाल्याने सभागृहातील वातावरण तापले असतानाच कमलाकर भोपळे यांनी विकास निधीचा मुद्दा उपस्थित केला. आधी त्यांना बोलूच दिले जात नव्हते; त्यामुळे भोपळे संतप्त झाले होते. सभागृहात बोलण्याची संधी मिळताच त्यांनी विकास निधीच्या मुद्द्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.सभागृहात भोपळे यांनी अत्यंत उद्विग्नपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘मी वडणगे येथील रहिवासी होतो. शहरात राहायला आलो आणि जनतेने मला महानगरपालिकेवर निवडून दिले. ‘प्रभागाचं सोनं करतो’ असे आश्वासन मी जनतेला निवडणुकीत दिले.

दोन वर्षांत दोन पैशांचा निधी मला मिळालेला नाही. त्यामुळे आता परत वडणगेला जायचा विचार माझ्या मनात आला आहे. निधी मागायला गेलो की तो मिळत नाही. टेंडर निघायची वेळ आली की अधिकारी ताकतुंबा करतात. अमुक कागद आणा, तमुक नकाशा आणा, असे सांगितले जाते. कामे होत नाहीत म्हटल्यावर जनताही नाराज झाली आहे. ‘कामे होत नसतील तर गोट्यांनी खेळा,’ अशा शब्दांत मतदार आमचा अपमान करतात. आता येथे येऊन कोणाबरोबर गोट्या खेळायच्या ते आयुक्तसाहेब, तुम्हीच सांगा. मी तुमच्याकडे आज कटोरा घेऊन आलोय. त्यात काहीतरी निधी टाका. नाही तर आम्ही दिलेल्या सगळ्या फाईल्स फाडून टाका.’

भोपळे यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सर्वच सदस्यांनी सहमती दर्शविली. भूपाल शेटे, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, रूपाराणी निकम, मुरलीधर जाधव यांनी विकास निधी लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली. त्यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गेल्या वर्षी अंदाजपत्रकात ५९६ कामे धरण्यात आली होती; त्यांपैकी २९१ कामे २०१५-१६ मध्ये मंजूर झाली; तर १६१ कामे २०१६-१७ मध्ये मंजूर झाल्याची त्यांनी माहिती दिली. या वर्षीची कामे आता पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.शौचालयाला साडी लावलीप्रभागातील शौचालयास दरवाजे नाहीत. ते मोडून पडले आहेत. दरवाजे लावा म्हणून किती दिवस सांगतोय; पण कोणीही लक्ष देत नाहीत. शेवटी एका महिलेने गैरसोय होतेय म्हटल्यावर दरवाजा म्हणून चक्क साडी लावली... महानगरपालिकेची इतकी वाईट अवस्था झाली आहे का? अशी विचारणा कमलाकर भोपळे यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली, तेव्हा आयुक्तही निरुत्तर झाले.