शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’च्या गुंत्यात अडकली महापालिका

By admin | Updated: June 24, 2014 01:20 IST

जकातीपेक्षा उत्पन्न कमी : अडीच महिन्यांत १० कोटींची तूट

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी महापालिकेकडे की केंद्र सरकारच्या विक्रीकर विभागाकडे द्यावयाचा याचा निर्णय आजअखेर झालेला नाही. राज्य शासनाने याबाबतचा आदेश महापालिका प्रशासनाला किंवा विक्रीकर खात्याला मिळालेला नाही. दरम्यान, १ एप्रिल ते २३ जून २०१४ अखेर साडेसोळा कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीचे वसूल झाले आहेत.१ एप्रिल २०११ पासून महापालिकेने जकात रद्द करून एलबीटी सुरू केला. शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटी करप्रणालीस तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, एलबीटीची वसुली महापालिकेककडून विक्रीकर विभागाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण, याबाबत शासन आदेश झालेला नाही. एकीकडे, एलबीटी ही जाचक करप्रणाली रद्द करून मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) एक टक्का वाढवावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. सध्या महापालिका एलबीटीची वसुली करत आहे.दुसरीकडे, गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. गत आठवड्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींमुळे एलबीटी कोणाकडे द्यावयाचा आदेश झाला नाही. पण, मुख्यमंत्री चव्हाण राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हा आदेश या आठवड्यात होण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तविली जात आहे.दरम्यान, राज्य शासनाकडून एलबीटीला पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. एलबीटी जाणारच आहे तर कशाला भरा, या व्यापाऱ्यांच्या मानसिकतेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. गेल्या अडीच महिन्यांत फक्त १६ कोटी एलबीटी जमा झाली. दहा कोटींची तूट भरून कशी काढायची, हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. एलबीटी तुटीचा विकासकामांवर परिणाम होत आहे.महापालिकेचे जकात हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत होते. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. जकात रद्द झाल्याने फटाके वाजविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या कर प्रणालीस विरोध केला. पहिल्या वर्षी २०११-१२ ला ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३ तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. एलबीटीमधून महापालिकेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असतानाच शासनाने एलबीटी रद्दचा घाट घातला. परिणामी नियमित एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनीही याकडे पाठ फिरविली.