शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेला मिळाले एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त ; सेवेचा श्रीगणेशा कोल्हापुरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 11:35 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर अखेर तीन अधिकरी मिळाले असून, हे दोन्ही अधिकारी लवकरच रुजू होतील, अशी ...

ठळक मुद्दे अन्य अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर अखेर तीन अधिकरी मिळाले असून, हे दोन्ही अधिकारी लवकरच रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.तिन्ही अधिकारी हे परीविक्षाधीन असून, ते आपल्या सेवेचा श्रीगणेशा कोल्हापुरातून करीत आहेत. मुख्याधिकारी गट ‘अ’म्हणून शासकीय सेवेत दाखल झालेले निखिल बाजीराव मोरे हे उपायुक्त म्हणून तर मुख्याधिकारी गट ‘ब’ म्हणून सेवेत दाखल झालेले अवधूत रवींद्र कुंभार व चेतन किरण कोंडे सहाय्यक आयुक्त म्हणून महापालिकेकडे रुजू होतील.

कोल्हापूर महानगरपालिकेत गेले चार वर्षे दोन उपायुक्त व दोन सहाय्यक आयुक्त यांची पदे रिक्त आहेत. भाजप सरकारच्या काळात राज्य सरकारकडे मागणी करूनही अधिकारी मिळाले नाहीत. प्रत्येक वेळी कोल्हापूर महानगरपालिका सोडून बोला, एवढे शासकीय पातळीवरून सांगितले जात होते. महापालिका आयुक्त, माजी आमदार अमल महाडिक यांनीही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले होते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले नाही.

दोन उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा महापालिकेच्या दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला होता. आता परिवीक्षाधीन का असेना तीन अधिकारी मिळाल्याने कामात थोडी सुसूत्रता येईल. अन्य अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर