शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भरणा करण्याकरिता कोल्हापूर महापालिकेचे अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:18 IST

महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अ‍ॅप तयार करणार आहे; त्यामुळे लवकरच घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देभरणा करण्याकरिता महापालिकेचे अ‍ॅपकरदात्यांची घरबसल्या होणार सोय

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अ‍ॅप तयार करणार आहे; त्यामुळे लवकरच घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य होणार आहे.महानगरपालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रामधून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा नागरिकांना जलदगतीने मिळण्याबाबत मंगळवारी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौर कार्यालयात मुख्य लेखापाल, सिस्टीम मॅनेजर व संबंधित विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.शहरातील नागरिकांकडून महानगरपालिकेस विविध कर भरणा करण्यात येतो. तो आॅनलाईन पद्धतीने त्यांना घरबसल्या भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे महापौर लाटकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

सी. एस. आर. फंडातून अ‍ॅक्सिस बँकेने मोफत अ‍ॅप तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. सदरचे अ‍ॅप १३ ते २० दिवसांत तयार होणार असून, याचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येणार असल्याचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी सांगितले.यावेळी महापौर लाटकर यांनी सर्वच नागरी सुविधा केंद्रांमध्ये जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा केंद्रामध्ये त्वरित मिळण्यासाठी आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे असेसमेंट उतारादेखील आॅनलाईन पद्धतीने मिळण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करून नागरिकांना देण्याच्या सूचनाही दिल्या. बैठकीस नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसचिव दिवाकर कारंडे, सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग राजपूत उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर