शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

मुंबईचा नयन चॅटर्जी कार्टिंग स्पीडस्टार

By admin | Updated: August 22, 2016 00:24 IST

राष्ट्रीय चॅम्पियनशिप : कोल्हापूरचा चित्तेश दुसरा, तर आकाश तृतीय स्थानी; ज्युनिअर गटात यश आराध्य, मायक्रो गटात अर्जुन नायर विजेते

कोल्हापूर : पावसाचा शिडकावा.. मध्येच सूर्यनारायणाचे दर्शन... प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या आणि प्रोत्साहन अशा उत्साही वातावरणात रंगलेल्या राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ गटात मुंबईच्या नयन चॅटर्जीने चमकदार कामगिरी करीत बाजी मारली. ‘लोकलबॉय’ चित्तेश मंडोडीने अनपेक्षितपणे दुसरे स्थान काबीज करून कोल्हापूरकरांना जल्लोष करण्याची संधी दिली. याचबरोबर ज्युनिअर गटात यश आराध्य, तर मायक्रो गटात अर्जुन नायर विजेते ठरले. कोल्हापूरजवळील हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर १३ व्या जे. के. टायर-एफएमएसीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशिपची रविवारी अंतिम फेरी पार पडली. या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन फेरीचा विजेता रिकी डॉनिसन. त्याला टक्कर देणारा कोल्हापूरचा ध्रुव मोहिते हे कारमध्ये झालेल्या बिघाडामुळे शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. सीनिअर गटात सहाव्या स्थानावरून सुरुवात करणाऱ्या नयन चॅटर्जीने पहिल्यापासूनच आघाडी घेतली. पाचव्या लॅपपर्यंत तो पुढे होता. त्यानंतर थोडा मागे पडला, पण त्याने लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शेवटी त्याने २० मिनिटे ३४.८४२ सेकंदाची वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला. कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने थोड्या वेळासाठी आकाशला मागे टाकत आघाडी घेतली तेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष केला. परंतु नयनने पुन्हा त्याला मागे टाकले. ध्रुव मागे पडू लागला. १२ व्या लॅपनंतर तो बाहेर पडला. ध्रुवने निराशा केली असली तरी चित्तेश मंडोडीने कोल्हापूरकरांना जल्लोषाची संधी दिली. जवळजवळ दोन वर्षांनंतर ट्रॅकवर पुनरागमन करणाऱ्या चित्तेशने जबरदस्त कामगिरी करून दुसरे स्थान पटकावले. त्याने २० मिनिटे ४०.४९४ सेकंदाची वेळ नोंदवली. २० मिनिटे ४५.४०३ सेकंदाची वेळ नोंदवणारा आकाश गौडा तिसऱ्या स्थानावर राहिला. ज्युनिअर मॅक्स गटात बंगलोरचे वर्चस्व राहिले. यश आराध्य याने पहिल्या क्रमांकावर कब्जा मिळवला. चिराग घोरपडे दुसऱ्या स्थानावर, तर पॉल फ्रान्सिस तिसऱ्या स्थानावर राहिला. या गटात आतापर्यंतच्या तिन्ही फेऱ्यातही आघाडी घेतलेल्या मानव शर्माला आजच्या चौथ्या फेरीत अपयश आले असले तरी त्याच्या एकूण गुणसंख्येत फरक पडलेला नाही. मायक्रो गटात आग्य्राचा शाहान अली आघाडीवर होता, परंतु पाऊस आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. याचा फायदा घेत बंगलोरच्या अर्जुन नायरने पहिले स्थान मिळवले. या गटात बंगलोरचाच यश मोरे तिसऱ्या स्थानावर राहिला. विजेत्यांना आण्णासाहेब मोहिते, शिवाजी आणि मोनिका मोहिते, अभिषेक आणि रिधिमा मोहिते यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रिकी दुसऱ्या स्थानावर घसरला ४या वर्षीच्या तिन्ही फेऱ्या जिंकणारा रिकी डॉनिसन हा या फेरीतही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात होता, पण रेसच्यावेळेस वरून पडणारा पाउस आणि त्यामुळे ओला झालेला ट्रॅक याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. ४त्याच्या कारमध्ये बिघाड झाल्याने तो बाजूला झाला, काही वेळानंतर दुसऱ्या कारसह तो पुन्हा रेसमध्ये आला; परंतु तोपर्यंत संयोजकांनी त्याला अयोग्य घोषित केले होते. या फेरीत त्याला केवळ ३८ गुणांवर समाधान मानावे लागले. आता तो एकूण ३२४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.