शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेचा प्रचार होणार दमदार,प्रसिद्धीसाठी २१ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:04 IST

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून मिळणारे कर्ज, त्याच्या जाचक अटी, परतफेड व वसुलीविषयी अनास्था अशा अनेक प्रश्नांचा गुुंता तयार झाला असताना, शासनाने मात्र योजनेचा प्रचार मात्र दमदार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रचार प्र्रसिद्धीपासून २१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत प्रचारावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्दे मुद्रा योजनेचा प्रचार होणार दमदार,प्रसिद्धीसाठी २१ लाखांचा निधी: सर्व स्तरांवर प्रचाराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून मिळणारे कर्ज, त्याच्या जाचक अटी, परतफेड व वसुलीविषयी अनास्था अशा अनेक प्रश्नांचा गुुंता तयार झाला असताना, शासनाने मात्र योजनेचा प्रचार मात्र दमदार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रचार प्र्रसिद्धीपासून २१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत प्रचारावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत समिती सचिव जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, अशासकीय सदस्य अर्चना रिंगणे, नचिकेत भुर्के, तानाजी ढाले, नामदेव चौगुले, नाथ देसाई यांची उपस्थिती होती.या योजनेंतर्गत लघू उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांना बँकांकडून विनातारण कर्ज पुरविले जाते. तथापि या योजनेतून दिल्या गेलेल्या कर्जाची वसुली होत नसल्याने बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला आहे. यासंदर्भात समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यावरच चर्चा झाली; त्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार करण्याचा निर्णय झाला.

त्याकरिता नगरपंचायती, नगरपरिषद, ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून अधिकाधिक प्र्रसिद्धी करण्यासाठी फलक लावण्याचे ठरले. बँकांच्या दर्शनी भागातच फलक लावावेत, असे ठरले. याशिवाय होर्डिंग्ज, रेडिओ, टी. व्ही. आणि वर्तमानपत्रे आदींच्या माध्यमातून जाहिरात करण्याचेही ठरले. हे सर्व करण्यासाठी २१ लाखांचा निधीही शासनाकडून प्राप्त झाल्याचे समन्वय समिती सचिवांनी बैठकीत सांगितले.

मुद्रा योजनेतून २0१७ पासून वाटप झालेल्या कर्जाची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली. त्यानुसार २0१७ मध्ये ३१ हजार १0२ लाभार्थ्यांना ६२१ कोटी ७६ लाख, २0१८ मध्ये ३६ हजार ८१३ लाभार्थ्यांना ६३९ कोटी ४ लाखांचे तर २0१९ मध्ये १९ हजार ५५५ लाभार्थ्यांना १५३ कोटी ९३ लाखांचे कर्ज आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर