शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

महावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा : तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:57 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

कोल्हापूर : आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेकडे थकलेली वीजबिले भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आंदोलने सुरू आहेत. तरीदेखील महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.वीज बिल भरणार नाही, कृती समितीने केलेल्या आवाहनामुळे बिले भरण्यास नागरिकांनी हात अखडता घेतला आहे. बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीमच उघडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजारांवर कनेक्शन्स तोडली आहेत.

या सर्वांना रिकनेक्शन देणे ही महावितरणची जबाबदारी असताना, ३०० ते ४०० रुपयांची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर हा सिस्टीममधूनच मेसेज येतो. त्यामुळे पैसे घ्यावे लागतात हे उत्तर दिले जात आहे.बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीची आंदोलनाची हाकमहावितरणकडून सुरू असलेल्या या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवण्यासाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती पुढे आली आहे. किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, सतीश पोवार, राहुल चौधरी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, प्रशांत बरगे, मुसा शेख, महादेव जाधव, अनिल कोळेकर, विजय जाधव यांनी कनेक्शन जोडायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले, तर संघटितपणे विरोध करा, असे आवाहन केले आहे.

एक तर वाढीव बिले आमच्या माथ्यावर मारली आहेत. ती भरली नाहीत, तर कनेक्शन तोडण्याचा दांडगावा केला जात आहे. हा सारासार अन्याय असून, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना दिसतील तेथे घेरावो घालू, त्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे, तेथे जाऊन काळे झेंडे दाखवू.-किसन कल्याणकर,संस्थापक, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती

विजेचे कनेक्शन तोडले असल्याने महावितरणच्या नियमांनुसार तेथे कर्मचाऱ्याचा वापर होत असल्याने त्याचे चार्जेस आकारले जातात. घरगुती कनेक्शन तोडले असल्यास ३०० रुपये लेबर चार्जेस म्हणून आकारणी केली जाते. हा नियमच आहे, यात काही काळेबेरे अथवा भ्रष्टाचार नाही.-किशोर खोबरे,जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर