विद्यापीठ अधिकार मंडळाच्या सूचनेनुसार एम. फिल., प्री-पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा प्रचलित वर्णनात्मक ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यासक्रमनिहाय पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत अधिविभाग आणि महाविद्यालयांनी परीक्षांचे आयोजन करावे, अशी सूचना विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केली आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव उन्हाळी सत्रातील परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने त्यांची पुर्नपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार गुरुवार (दि. १६)पासून बी. कॉम., बीबीए., बीसीए., बी. एस्सी., बी. टेक., बी. व्होक., बीओडी., बीआयडी., बीडीएस, तर दि. २१ सप्टेंबरला बी. ए., एम.ए., एम. कॉम., एम. एस्सी., एमएसडब्ल्यू., एमसीए अभ्यासक्रमाची परीक्षा होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक परीक्षा मंडळाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
अधिविभागांमध्ये होणार एम. फिल., प्री-पीएच.डी. परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST