शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 13:42 IST

बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : तीन जागा दिल्या असत्या तर जिल्हा बँक बिनविरोध झाली असती पण सत्तारुढ गटाने आम्हाला लढायला लावले, आम्ही मागून मिळाले नाही ते जिंकून घेऊन दाखवले, अशी रोखठोक प्रतिक्रिया जिल्हा बँकेतील विरोधी शिवसेना आघाडीचे पॅनेल प्रमुख खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली. जनतेच्या ताकदीवर आम्ही जिंकून दाखवले आहे, आता शिवसेनाच बँकेच्या सत्ताकारणात किंगमेकर असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाभारतात कौरवांनी सुईच्या टोकाएवढी देखील जमिन देणार नाही असे सांगत पांडवावर युध्द लादले, पण पांडवांनी हस्तीनापूरमध्ये काय केले आणि महाभारत कसे घडले हे जनतेला माहीत आहे याचे उदाहरण देऊन खासदार मंडलीक यांनी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याचे सांगितले. बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असे सांगितले. बँकेच्या सत्ताकारणात शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अनेक जण आतापासूनच संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना आघाडीसोबत राहणार असल्याची भूमिका घेतली आहे, त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षात संचालक म्हणून माझ्या संपर्कात असलेले देखील आताही संपर्कात येत आहेत, असे सांगितले. यामुळे आता अध्यक्षपदासाठीचे लॉबींग सुरु झाले आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकारणातून एकमेकांच्या उमेदवारीला झालेला विरोध, जागा वाटपात न झालेली तडजोड यामुळे अखेर निवडणूक लागली. शिवसेनेने विरोधी पॅनेल उभा करत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. तर भाजपने सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली होती.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसShiv SenaशिवसेनाSanjay Mandalikसंजय मंडलिक