शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे खासदार चमकले... प्रश्न रेंगाळले...!

By admin | Updated: May 26, 2016 01:05 IST

मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण : नव्या सरकारच्या काळातही जिल्ह्याच्या विकासाची पावले अडखळतच; राजकीय ताकदही कमी पडली

विकासात्मक पातळीवर शेट्टींची आघाडीखासदार राजू शेट्टी यांनी दोन वर्षांत रस्ते, रेल्वे पूल आदीसाठी केंद्राकडून २०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील कोकण रेल्वे, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणास मंजुरी आणून विदर्भ, मराठवाडा व कोकणाला पश्चिम महाराष्ट्र जोडण्यात, मिरज ते पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणास मंजुरीत महत्त्वाची भूमिका बजावली. जादा ऊस दरासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. निर्यात अनुदान, मळीवरील बंदी उठवून कारखानदारांना दिलासा दिला. कोल्हापूर : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला आज, गुरुवारी दोन वर्षे होत आहेत. नव्या सरकारने लोकांना जी स्वप्ने दाखविली, त्यातील किती पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय आहे. नव्या सरकारच्या काळात कोल्हापूरच्या विकासाचे पाऊल पुढे पडले का, याचा धांडोळा घेतल्यास त्यातून फारसे काही हाती लागत नाही. दोन्ही खासदार व्यक्तिगत पातळीवर चमकल्याचे दिसत असले तरी, कोल्हापूरच्या प्रश्नांना गती देण्यात त्यांना पुरेसे यश आलेले दिसत नाही. राजकीय ताकद कमी पडत असल्याचेच हे द्योतक आहे. ‘टॉप थ्री’ची महाडिकांना पोहोचपावतीएकेकाळी कोल्हापूरच्या खासदारांना उपहासाने ‘मौनीबाबा’ म्हटले जायचे. परंतु खासदारांची ही ‘मौनीबाबा’ची प्रतिमा धनंजय महाडिक यांनी प्रयत्नपूर्वक पुसून तर काढलीच; शिवाय संसदीय कामकाजातील ‘टॉप थ्री’ खासदारांच्या यादीत स्थान पटकावले, हीच त्यांच्या दोन वर्षांतील खासदारकीच्या कामाची पोहोचपावती म्हणावी लागते. खासदार महाडिक यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी २१२ कोटींचा निधी खेचून आणण्यातही यश मिळविले. दोन वर्षांत त्यांनी ५३८ विषयांवर लोकसभेत भाषणे केली आहेत. त्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा विषय तर केंद्र सरकारतर्फे धोरण म्हणून स्वीकारला गेला. साखर उद्योगातील चढउतार आणि या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारला त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. निधी आणण्यातील अपयशाने पंचगंगा प्रदूषितचपंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठीचा १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल निधीसाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे वर्षापूर्वी पाठविण्यात आला होता. मात्र, निधी आणण्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांना यश आले नाही. त्यामुळे अजूनही पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता आलेल्या नाहीत. नदीकाठावरील ३८ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. परिणामी नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. विकास आराखड्याच्या पुढे ‘उड्डाण’ नाहीचदेशातील लो-कॉस्ट विमानतळांमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश करण्याचे काम भाजप सरकारकडून झाले आहे. विमानतळाच्या विकासाचा आराखडाही तयार केला आहे. त्यापुढे सरकारकडून काहीच पाऊल पडले नाही. विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले असले तरी विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन संपादित करण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठरावाचा मुद्दा दीड वर्षापासून अडखळला आहे.‘आदर्श गाव’मध्ये खासदार नापासकेंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावच्या सर्वांगीण विकासातही दोन्ही खासदार नापास झाल्याची प्रतिक्रिया संबंधित ग्रामस्थांमधून उमटत आहेत. गावचा कायापालट होईल यासंबंधी त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ सुरू केली. योजनेंतर्गत जिल्ह्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी पेरिड (ता. शाहूवाडी), कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द (ता. चंदगड), राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सोनवडे (ता. शाहूवाडी) गाव गेल्यावर्षी दत्तक घेतले. या योजनेतून गावची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली; पण या योजनेसाठी स्वतंत्र असा निधी नाही. त्यामुळे विकासकामे करण्यावर मर्यादा आल्या. खासदार शेट्टी, खासदार महाडिक सध्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून काही विकासकामे केली आहेत; पण सर्वांगीण विकास झालेला नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे.