शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड सक्तीविरोधात कोल्हापूरात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:46 IST

 कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने. परिपत्रकांची होळी जिल्हयातील कन्नड भाषेचे फलक दहा दिवसात उतरा

कोल्हापूर , दि. २४ :  कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हयातील कन्नड भाषेमधील असणारे फलक संबधित खात्याच्या अधिकाऱ्यानी दहा दिवसात उतरुन घ्यावेत, अन्यथा शिवसैनिक आपल्या स्टाईलने उतरतील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी दिला.

कर्नाटक सरकारने कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केली आहे. स्वत:च्या राजकिय पोळी भाजण्यासाठी कन्नडींग शासनकर्त्यांनी कुटील कारस्थान रचले आहे.

या कन्नडीगांनी कन्नड भाषेतूनच सक्तीचे शालेय शिक्षण घेण्याचा निर्णयाचे परिपत्रक लादून हिंदूस्थानच्या राज्यघटनेने विद्यार्थ्यांना भाषा निवडीच्या दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करुन सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यावंर अन्याय केला आहे.

या भाषेसक्तीच्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भाषा निवडण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊन परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे कर्नाटकातील दिल्ली बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक पदवी शिक्षणाच्या बाबतीत मागे राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

या सर्व गंभीर बाबींचा विचार करुन केंद्र शासनाने कन्नड भाषेमधून शिक्षण घेण्याची सक्ती रद्द करण्याचे आदेश कर्नाटक राज्यसरकारला द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच ‘नाली काली कन्नडा ’, ‘काली नाली कन्नडा’ ही पाठ्य पुस्तके रद्द करुन शाळेतून कन्नड भाषा सक्तीचा घातलेला हा घाट अंमलात येऊ नये.

निदर्शनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, रवी चौगले, अवधूत साळोखे, दत्ता टिपुगडे, शशिकांत बिडकर, प्रा. शिवाजीराव पाटील, राजेंद्र पाटील,दिलीप जाधव,दिलीप देसाई,राजू यादव,विनोद खोत,दिनेश परमार,चंदू भोसले,शुभांगी पोवार,दीपाली शिंदे, सुनीता निकम,मेघा पेडणेकर, अमित कांबळे आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण