शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माल ट्रक वाहतूकदारांचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:41 IST

कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्दे तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : ट्रक वाहतूकदार-व्यापाऱ्यांची बैठक दोन दिवसांपासून थांबलेले ट्रक पुन्हा धावणार

कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले.

दोन भरणीचे पैसे व्यापाऱ्यांनी व एका भरणीचे पैसे ट्रक वाहतूकदारांनी द्यावे, असा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर भरणीची रक्कम ही व्यापाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या भाड्यातच समाविष्ट करण्याबाबत पुढील १५ दिवसांनी बैठक घेऊन आढावा घेण्याचे ठरले. यानंतर ट्रक वाहतूकदारांनी गाड्या माल भरून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला.साखर व्यापाऱ्यांनी भरणी द्यावी. या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ट्रक वाहतूकदार संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक बंद आंदोलन सुरू केले होते. या विषयावर रविवारी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लॉरी संघटना, व्यापारी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, राजाराम साखर कारखान्याचे मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेंढे, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.यावेळी ट्रक वाहतूकदारांतर्फे सुभाष जाधव, व्यापाऱ्यांतर्फे श्रीमल जैन, हमालांतर्फे सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी बाजू मांडली. जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर आयुक्त, कारखाना प्रतिनिधी, ट्रक वाहतूकदार, हमाल संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढू, त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या.

भरणीला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी आवश्यक आहे; त्यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी आढावा घेण्याची ग्वाही दिली. यावर सुभाष जाधव दोन भरण्या व्यापाऱ्यांनी द्याव्यात, एक भरणी आम्ही सोसू, अशी भूमिका मांडली. अखेर साखर आयुक्त, कामगार, माथाडी मंडळाशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यावर एकमत झाले. त्याला व्यापारी संघटनांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोन महिन्यांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, दिनकर पाटील, नयन प्रसादे, रमेश कणेरकर, पंडित कोरगावकर, रोहन बेंडके, डी. एच. गायकवाड, यशवंत हुंबे, अमित खटावकर, आदी उपस्थित होते.व्यापाऱ्यांनीही शनिवारी दिले निवेदनभरणीबाबत ट्रक वाहतूकदारांनी ३० जुलै आणि २ आॅगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन २२ सप्टेंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. ट्रक वाहतूकदार संघटनांनी आंदोलन सुरू करताच शनिवारी (दि. २४) व्यापारी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर