शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

कोल्हापुरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा स्थापन करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:48 IST

मराठी नाट्य परिषदेची आणखी एक शाखा कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, यासाठी विविध तालुक्यांतील नाट्यकर्मींशी संपर्क साधला जात आहे. नाट्यक्षेत्राशी संबंधित वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या नव्या शाखेची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा स्थापन करण्याच्या हालचालीवैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस, जिल्ह्यातील नाट्यकर्मींशी संपर्क

समीर देशपांडे

कोल्हापूर : मराठी नाट्य परिषदेची आणखी एक शाखा कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, यासाठी विविध तालुक्यांतील नाट्यकर्मींशी संपर्क साधला जात आहे. नाट्यक्षेत्राशी संबंधित वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या नव्या शाखेची गरज व्यक्त करण्यात येत आहे.गेली अनेक वर्षे नाट्यपरिषदेची कोल्हापूर शाखा येथे कार्यरत आहे. या शाखेचे ८५० हून अधिक सभासद आहेत. सध्या प्रसिद्ध नाट्यवितरक आनंद कुलकर्णी हे या शाखेचे अध्यक्ष आणि मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत; तर नाट्यवितरक गिरीश महाजन हे नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही नाट्यकर्मी सक्रिय झाले असून त्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाट्यमहोत्सवामध्येही या संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे; परंतु ही सर्व मंडळी नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वर्तुळाबाहेर असल्याचे सांगण्यात येते.कोल्हापूरच्या नाट्यपरिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नसल्याने किंवा जे उपक्रम राबविले जातात, ते केवळ नाट्यव्यवसाय वृद्धी डोळ्यांसमोर ठेवून आखले जात असल्याने याविषयी काही नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. विद्यमान संचालक मंडळामध्ये रंगमंचावर सक्रिय असणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील सर्व प्रवाहांना प्रतिनिधित्व दिसत नाही. त्या अनुषंगाने सर्वसमावेशक कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही, अशी तक्रार नव्या दमाच्या कलाकारांकडून होत आहे.म्हणूनच स्वतंत्र नाट्यपरिषदेची शाखा स्थापन करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरू करण्यात आले आहेत. इचलकरंजी, राधानगरी, आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांकडे फॉर्मचे वितरण करण्यात आले असून, ते सध्या भरून घेण्याचे काम सुरू आहे. सुमारे दीडशे जणांचे अर्ज संकलित केल्यानंतर मग ते नाट्यपरिषदेच्या मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून, सर्वसाधारण सभेनंतर नव्या शाखेला मान्यता घेण्यात येणार आहे.

नवीन शाखा स्थापन करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत, याची माहिती मिळाली आहे. नाट्यक्षेत्राशी संबंधितच आम्ही सर्वजण सध्या नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेवर कार्यरत आहोत. आमच्या परीने जे शक्य आहेत, असे अनेक उपक्रम आम्ही राबवीत आहोत. काही नियोजित आहेत. ज्यांच्याकडे काही नव्या कल्पना आहेत, अशा मंडळींनी काही नवीन करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर तसे उपक्रमही घेता येतील. तरीही नवी शाखा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तर स्वागत आहे.आनंद कुलकर्णीअध्यक्ष, मराठी नाट्यपरिषद, कोल्हापूर शाखा

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर