शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अंध-अपंग लाभार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 00:47 IST

इचलकरंजी पालिकेसमोर ठिय्या : निधी वाटपावरून आंदोलनकर्ते व लेखापाल यांच्यात वाद

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : शहरातील अंध-अपंगांसाठी राखीव असलेल्या निधीचे वाटप करावे, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर काढलेल्या मोर्चातील आंदोलकांनी तासभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी या सामोरे गेल्या असताना झालेल्या चर्चेवेळी निधीच्या रकमेतील फरकावरून आंदोलक भरमा कांबळे व लेखापाल राजेंद्र महींद्रकर यांच्यात वाद झाला. दरम्यान, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे व मॅँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद सागर चाळके यांनी मध्यस्थी केली. आज, मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन दिले.अपंगांना नगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे महसुली निधीच्या तीन टक्के निधीचे वाटप करावे, अशी मागणी वारंवार करूनसुद्धा पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून सोमवारी अंध-अपंग कल्याण संघाच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेतील प्रवेशद्वारामध्ये आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्ध्या तासानंतर नगराध्यक्षा स्वामी या आंदोलनास सामोरे गेल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले लेखापाल महींद्रकर यांनी माहिती देताना नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील महसुली निधीपैकी तीन टक्के म्हणजे १.७५ कोटी रुपये इतका निधी आरक्षित आहे, असे सांगितले. मात्र, राखीव निधीची रक्कम तीन कोटी रुपये असल्याबद्दल कल्याण संघाच्यावतीने भरमा कांबळे यांनी दावा केला. त्यावर महींद्रकर व कांबळे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी शंखध्वनी करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वजण उठून उभे राहिले. त्यामुळे गोंधळ उडाला आणि नगराध्यक्षा परत निघून गेल्या.दरम्यान, उपनगराध्यक्ष मोरबाळे व मॅँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद चाळके मोर्चासमोर गेले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अखेरीस आज, मंगळवारी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.सव्वा कोटींचा फरक आणि गोंधळनगरपालिकेच्या असलेल्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये अंध-अपंगांसाठी तीन टक्के म्हणजे तीन कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद असल्याची माहिती संघटनेला यापूर्वी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली. सोमवारच्या अंध-अपंगांच्या आंदोलनावेळी माहिती सांगताना महसुली अंदाजपत्रकामध्ये हीच रक्कम १.७५ कोटी रुपये होत असल्याची माहिती लेखापाल राजेंद्र महींद्रकर यांनी दिली. त्यांच्या याच मुद्द्यावरून पालिकेवरील आंदोलनावेळी गोंधळ उडाला. मुख्याधिकारी व लेखापाल यांनी सांगितलेल्या आकडेवारीमध्ये सव्वा कोटी रुपये असलेला फरक हाच कळीचा मुद्दा ठरला, याची चर्चा आंदोलनकर्ते व नगरपालिकेमध्ये सोमवारी दिवसभर होती.५इचलकरंजीत अंध-अपंग कल्याण संघाच्यावतीने नगरपालिकेवर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावेळी कल्याण निधीबाबत वाद निर्माण झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे उडालेला गोंधळ.