शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

‘आजरा’ कारखाना निवडणुकीच्या हालचाली

By admin | Updated: December 8, 2015 00:43 IST

उमेदवारांचा शोध सुरू : विधानसभा-लोकसभा निवडणुकीचे संदर्भ राहणार; संचालकांतील मतभेद चव्हाट्यावर

ज्योतीप्रसाद सावंत-- आजरा साखर कारखान्याच्या मे महिन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता प्रमुख नेतेमंडळींनी निवडणूक अटीतटीची होणार हे गृहीत धरून गटनिहाय प्रबळ उमेदवारांचा शोध घेण्यासाठी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.गत पंचवार्षिक निवडणूक तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर व के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होती. जयवंतराव शिंपी हे एकमेव टार्गेट करून स्वाभिमानीसह लहान-मोठे गट, पक्ष संघटना यांनी एकत्र येवून एकतर्फी विजय मिळवला. स्वप्नातही ज्यांना आपण कारखान्यात कधी संचालक होऊ असे वाटले नव्हते अशी मंडळीही निवडून आली आणि त्यांचे उखळ पांढरे होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत.परंतु गेल्या साडेचार वर्षांत कारखाना राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. कधी या उलथापालथींना विधानसभा-लोकसभा निवडणुकांची झालर तर कधी अंतर्गत हेवे-दावे असाच काहीसा प्रकार घडत राहिला. परिणामी एकत्र निवडून आलेल्या मंडळींच्या राजकीय दिशा बदलल्या. एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली. कधी सहकारी संचालकांवर तर कधी थेट नेतृत्व करणाऱ्या मंडळींवर या प्रकारामुळे संचालकांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले.राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राजकीय धूर्तपणा दाखवत राष्ट्रवादी लेबल असणाऱ्यालाच अध्यक्षपदाची संधी दिली. राष्ट्रीय काँगे्रस, शिवसेना यांची उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली. तर ‘स्वाभिमानी’ला शेवटपर्यंत ठेंगा दाखवला गेला. यामुळे कारखानाविरोधात पाच वर्षांपूर्वी केल्या जाणाऱ्या स्वाभिमानीच्या आंदोलनाची धार मात्र बोथट झाली.आता मात्र राष्ट्रवादीची नेतेमंडळी पुन्हा एकदा ‘जुळणी’ करू लागली आहेत. राष्ट्रीय काँगे्रसचे सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने एक पॅनेल तयार होणार हे स्पष्ट आहे. वसंतराव धुरे, जयवंतराव, मुकुंदराव, उदय पवार, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा यांच्यासोबत अंजनाताई रेडेकर अशी दिशा स्पष्ट होऊ लागली आहे.दुसरीकडे अशोक चराटी, विष्णूपंत केसरकर, राजू होलम, रमेश रेडेकर, श्रीपतराव देसाई ही मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे. अर्थातच अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. यात बदलही होऊ शकतो. शिवसेना, स्वाभिमानी, भाजप, श्रमुद यांच्याही भूमिका हळूहळू स्पष्ट होत जातील. या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर रंगत येत जाईल.कारखाना अडचणीत आहे. निवडणुकीचा भुर्दंड नको असा सूर आळवत सत्तारूढ मंडळी ‘बिनविरोध’चा पर्यायही पुढे आणतील. परंतु हा पर्याय फारसा यशस्वी होईल, असे सध्यातरी दिसत नाही.एकंदर कारखान्याची निवडणूक जोरदार होणार असे गृहित धरून प्रमुख नेतेमंडळींनी ‘वजनदार’ उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.