शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबाग तालीम, ‘कृष्णजा’ गर्दीने फुलून गेले...

By admin | Updated: June 23, 2014 00:50 IST

गणपतराव आंदळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर : कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना जाहीर झाल्याचे वृत्त समजताच आज, रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून आंदळकर यांना शुभेच्छा दिल्या. न्यू पॅलेस परिसरातील ‘कृष्णजा’ बंगला आणि भवानी मंडपातील मोतीबाग तालीम गर्दीने फुलली होती. तालमीतील मल्लांनी फटाक्यांची आतषबाजी करत, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच कुस्ती तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर हिंदकेसरी आंदळकर यांच्या ‘कृष्णजा’ बंगल्यात दुपारी दोन वाजल्यापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ लागले. त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, संजय जाधव, फिरोज बारगीर, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, सुमन शिंदे, संगीता चौगुले, दत्ता दाभोळे, प्रवीण पालव, बापू कोळेकर, आदींनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिंदकेसरी आंदळकर हे मोतीबाग तालमीत आले. याठिकाणी मल्लांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हिंदकेसरी आंदळकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ‘बीड’चे वस्ताद संजय कसबे, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार आदींसह मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)