शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतरंगातून उलगडले आईचे जीवनगाणे... ‘मदर्स डे’ : ‘अंतरंग’च्या कलाकारांनी उपस्थितांची जिंकली मने

By admin | Updated: May 12, 2014 00:30 IST

कोल्हापूर : ‘आई’ या शब्दातील ताकद मोजता येत नाही. आईपण निभावणार्‍या माउलींच्या सन्मानार्थ लोकमत सखी मंच आयोजित

कोल्हापूर : ‘आई’ या शब्दातील ताकद मोजता येत नाही. आईपण निभावणार्‍या माउलींच्या सन्मानार्थ लोकमत सखी मंच आयोजित संगीत मैफल रविवारी चांगलीच रंगली. गायन समाज देवल क्लब येथे ‘अंतरंग’ संस्थेच्या कलाकारांनी आईवरील एकापेक्षा एक गाणी सादर करुन उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने झालेला ‘वंदूया आईस...’ हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व गायन समाज देवल क्लबचे कार्यवाह अरुण डोंगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात गायक महेश हिरेमठ यांच्या ‘सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबकेगौरी...’ तसेच ‘तुझी सेवा मानून घे आई, कुशीत घे...’ हे गीत सादर करून झाली. तसेच जगात पंढरीच्या विठू माउलीलाही आईचाच मान आहे. आई सागरात आहे. तसेच आई परमेश्वरात आहे; म्हणून ‘विठू माउली तू माउली जगाची...’ हे सादर झालेले गीत सर्वांना भावले. शब्दसुरांच्या झुल्यावर मातृत्व उलगडणारे ‘आईसारखे दैवत सार्‍या जगतात नाही...’ हे गीत शुभांगी जोशी यांनी सादर केले. तर ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यस्वरूप आई’ हे गीत सोनाली कापसे यांनी सादर करुन उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळविली. महेश हिरेमठ यांनी ‘हंबरून वासरांना चाटते जवा गाय...’ ही वºहाडी कविता सादर केली. ‘जखमेवर हळद लावताना झोंबणार म्हणून ओरडणारे लहान बालक’ यावर ‘ते झोंबणं शोधतंय...’ ही नाना पाटेकर यांची कविता शुभदा हिरेमठ यांनी सादर केली. त्यावर महेश हिरेमठ यांनी गायनाने साज चढविला. त्यांनी ‘कितनी अच्छी मेरी मॉँ भोली, ओ मॉँॅ, ओ मॉँ’ हे हिंदी गीत सादर करीत उपस्थितांना ठेका धरायला लावला. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या सोहळ्यात आईला मुलाबद्दल सर्व काही माहीत असते, यासाठी ‘मैं कभी बतलाता नहीं अंधेरे से डरता हूॅँ ना मॉँ, तुझे सब है पता ना मॉँ’ हे गीत सादर केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’ हे गीत मातृभूमीसाठी सादर केले. या कार्यक्रमाची सांगता ग. दि. माडगूळकर यांच्या ‘तुझ्या वंदितो पावलासी, दिला जन्म तू विश्व हे...’ या गीतगायनाने करण्यात आली. शुभदा हिरेमठ यांनी सुरेख निवेदन केले. आशा माळकर यांनी स्वागत केले. तबला व ढोलकी साथ धीरज वाकरेकर, तालवाद्ये महेश कदम यांनी, तर सिंथेसायझरची साथ धनंजय कदम यांनी दिली. ध्वनिव्यवस्था श्रीधर जाधव व व्यवस्था स्वरूपा डोईफोडे यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)