शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्ह्यातील ५४६ गुन्हेगार मोस्ट वॉन्टेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:30 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील सुमारे ५४६ सराईत गुन्हेगार फरार आहेत. गेल्या ४२ वर्षांपासून पोलीस शोध सुरू आहे, इतकेच कारण सांगत आहेत. फरार गुन्हेगारांना त्यांच्या पत्त्यावर वारंवार नोटिसा देऊनही ते हजर होत नाहीत; त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘थर्ड डिग्री’पेक्षा आर्थिक फटका बसला, तर पुन्हा कोणी गुन्हेगार फरार होण्याचे धाडस करणार नाहीत. हा उद्देश समोर ठेवून ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. आतापर्यंत ३५ गुन्हेगारांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. हे सर्व गुन्हेगार सराईत असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. पोलीस त्यांच्या राहत्या पत्त्यावर गेले, तरी ते मिळून येत नाहीत. नातेवाईकही त्यांची माहिती लपवत आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे; परंतु आरोपी अटक नसल्याने हे गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांना फरार घोषित करून त्यांचे छायाचित्र, माहिती भित्ती फलकावर चिकटविली असून, सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केली आहे.शेख ते पवार-अकोळकर१९७६ पासून राजारामपुरी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल असलेला संशयित नन्हासाब बमिदाब शेख (रा. वड्डवाडी-राजारामपुरी) हा फरार आहे. त्याच्या पाठोपाठ २०१५ मध्ये पानसरे हत्येप्रकरणातील संशयित विनय बाबूराव पवार, सारंग दिलीप अकोळकर, अशी ही फरारांची साखळी आहे.कारागृहातील ३४ कैदी फरारखून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्णांत शिक्षा झालेल्या मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणच्या अंडरवर्ल्ड टोळीमधील गुन्हेगारांसह १८६० कैदी सध्या कारागृहात आहेत. कुटुंबासह स्वत:च्या आजारपणासाठी, तर मुलांच्या शैक्षणिक कामासाठी एक महिन्यासाठी पॅरोलवर (रजा) कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेले सुमारे ६९ कैदी गेल्या चार वर्षांपासून फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात पोलीसही हतबल झाले आहेत.