कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांवरील मतदानयंत्रे ऐनवेळी बदलावी लागली. उमेदवारांच्या नावापुढील बटण तीन वेळा दाबल्यानंतरच ‘बजर’ वाजत असल्याची तक्रार मतदारांनी केल्यानंतर प्रशासनाने ही यंत्रे बदलली. त्यानंतर नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे, चाफोडी; तर पन्हाळा तालुक्यातील पडळ, यवलूज, माजगाव; गगनबावडा तालुक्यांत मुटकेश्वर, मांडुकली या ठिकाणी मतदानयंत्रे बिघडल्यामुळे ती बदलण्याची वेळ आली. करवीरमध्ये अकरा वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाने वेग घेतला. सायंकाळी सहापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ८४.३७ टक्के मतदान करवीर मतदारसंघात झाले. बालिंंगेत गुद्द्यावर प्रकरणबालिंगे (ता. करवीर) येथे बोगस मतदान होत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यावरून कॉँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. प्रकरण ताणणार तोपर्यंतच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस दाखल झाल्याने तणाव निवळला. त्यानंतर काही वेळातच पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बालिंगे गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर येथे मतदान सुरळीत पार पडत ६८ टक्के मतदान झाले. याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याचे समजते. एकाच वेळी आजीसह २७ जणांचे मतदानपाटेकरवाडी (ता. करवीर) येथील विठाबाई दत्तू पाटील या ११० वयाच्या आजीसह त्यांच्या कुटुंबातील २७ जणांनी एकत्रित जाऊन मतदान केले, याची चर्चा परिसरात जोरात सुरू होती.शाहूवाडीत चुरस, ईर्षा अन् उत्साह -गावनिहाय मतदानाची टक्केवारी४डोणोली - ८६.६१ टक्के, सुपात्रे - ७४.७३, बांबवडे- ७५.७८, थेरगाव-८१.२९, खुटाळवाडी- ७७, परखंदळे ६६.५६ टक्के, सावर्डे ब्रु.- ७०.०५ टक्के, चरण ७५ टक्के, साळशी ७३.१८ टक्के, भाडळे-७९.०४ टक्के, गोगवे- ७६. ६० टक्के, पिशवी ७८.३६ टक्के, सैदापूर- ८८.०४ टक्के इतके मतदान झाले.४पन्हाळा आणि शाहूवाडी तालुकानिहाय एकूण मतदान, कंसात झालेले मतदान४शाहूवाडी- पुरुष ७३,५४७ (५४,३९३), महिला ६८,५२७ (५३,०४४), एकूण १,४२,०१४ (१,०७,४३७).४पन्हाळा - पुरुष ६५,४९३ (५४,२९६), महिला ५९,७८९ (४७,४६३), एकूण १,२५,२८२ (१,०१,७५९).1आमदार विनय कोरे यांनी वारणानगर, तर अमर पाटील यांनी कोडोली, सुपात्रे येथे कर्णसिंह गायकवाड, सरूड येथे सत्यजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर उमेदवारांनी मतदारसंघातील प्रमुख भागात दौरा केला.2 मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक दुर्गाप्रसाद बेहरा, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खाडे, सहायक निवडणूक अधिकारी ऋषिकेत शेळके, प्रशांत पिसाळ, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी भेटी दिल्या.3निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनासह लष्करी जवान, राज्य राखीव दल, होमगार्ड, आदींची सुरक्षा यंत्रणा सज्ज होती. एकूण ३२६ निवडणूक केंद्रांवर ४५० बॅलेट युनिट आणि ३६० कंट्रोल युनिटवर मतदान झाले.मतदारांच्या दिमतीस आलिशान वाहनेकोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत प्रचंड चुरस असल्यामुळे मतदारांच्या दिमतीला यावेळी प्रथमच मोठ्या संख्येने आलिशान वाहने राहिली. मतदारांना वाहनांतून केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यातूनच कार्यकर्ते थेट घराच्या उंबऱ्यापर्यंतच नव्हे, तर थेट चुलीपर्यंत मजल मारत मतदारांना आग्रहाने केंद्रापर्यंत आणत होते. मतदान झाल्यानंतर पुन्हा नेऊन सोडत होते.भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय अपक्षांचीही भाऊगर्दी आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांची संख्या अधिक होती. गेले महिनाभर उमेदवार व समर्थकांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघांतील वाड्या, वस्त्या, गावे पिंजून काढली, मतदारांना आवाहन केले. शेवटची रात्र कार्यकर्त्यांनी जागून खडा पहारा ठेवला.वाहनातून खाली उतरून केंद्रात सोडेपर्यंत कार्यकर्ते आमच्याच उमेदवाराला मत टाकावे, असे सांगत होते. सर्वच मतदान केंद्रांसमोर वाहनांची गर्दी झाली होती. चारचाकी वाहने जात नसलेल्या शेतामधील, डोंगरकपारीमध्ये असलेल्या घरांतून दुचाकीवरून मतदारांना आणले जात होते. चालता न येणारे वयोवृद्ध, अपंग, आजारी मतदारांना कार्यकर्त्यांनी उचलून नेऊन मतदान यंत्रापर्यंत पोहोचविले. अनेक खेड्यांमध्ये मतदानाला जाण्यापूर्वी मतदारासाठी सोय केलेल्या ठिकाणी चहा, नाष्टा दिला जात होता. पिणाऱ्यांची ‘सोय’ही केली होती. फुकटची मिळाल्यामुळे पिऊन ‘लोड’ झालेले तळिराम मतदार वादावादी, भांडण करीत होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास निलजी (ता. गडहिंग्लज) येथे दोन ’तळिरामां’मध्ये जोरदार वाद झाला. ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून तो मिटविला. वारणानगरसह परिसरात मोठ्या उत्साहात मतदान झाले. वारणानगर (७६ टक्के), बहिरेवाडी (८२ टक्के), जाखले (८५ टक्के), केखले (८६ टक्के), काखे (९० टक्के) अशा मतदानाची नोंद झाली. सर्वच गावांत प्रमुख उमेदवारांनी मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ‘वडाप’ करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असायची. यावेळी इनोव्हा, स्कॉर्पिओ, सुमो अशा आलिशान वाहनांची संख्या जास्त होती. कोण पहिल्यांदा जाऊन मतदारांना आपल्या वाहनातून घेऊन केंद्रापर्यंत पोहोचवतंय यासाठी जणू स्पर्धाच लागली होती.मुख्यत: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदार केंद्राबाहेरच मतदारांना पैसे देण्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसले. राजेंद्रनगरातील केंद्राबाहेर थांबलो असता एक दाम्पत्य मोटारसायकलवरून आले व मतदान करून जाताना उमेदवाराच्या समर्थकांकडून २०० रुपये घेऊन गेले. अधिक चौकशी केली असता त्यांच्या घरातील इतर मतदारांना आणण्यासाठी रिक्षा भाडे म्हणून त्यांनी ते पैसे नेल्याचे सांगण्यात आले. एका गटाने रात्री त्या परिसरात मताला ५०० रुपये दिल्याचे समजल्यावर दुसऱ्या उमेदवाराकडून उंबऱ्याला थेट हजार रुपयांप्रमाणे पैसे देण्यात आले. काही ठिकाणी एकत्रित गटाने मतदान आणून चिठ्ठी दाखवून सरळ हिशेब करून पैसे घेण्यात आले.करवीर मतदारसंघात अटीतटीची लढत होत आहे. चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते गेले महिनाभर जिवापाड राबत होेते. घराघरांत उमेदवारांसह त्यांचे चिन्ह पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने मतदारांना बाहेर काढण्याची खरी जबाबदारी कार्यकर्त्यांवर होती. त्यामुळे सकाळपासून एका-एकामतासाठी कार्यकर्ते धडपड करीत होते. ग्रामपंचायत निवडणुकीसारखी ईर्षा आजच्या मतदानात दिसली.
‘करवीर’मध्ये सर्वाधिक मतदान..बालिंंगेत गुद्द्यावर प्रकरण
By admin | Updated: October 16, 2014 00:59 IST