शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 17:17 IST

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट

समीर देशपांडेकोल्हापूर : एक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वा लाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात असून मुंबई राजधानी शेजारच्या ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. निरक्षरतेबाबत गडचिरोली, वाशिम आणि नाशिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर आहेत.केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबवण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून त्यानुसार महाराष्ट्रातही कामकाज सुरू झाले आहे. परंतु सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरू आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.१५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर करण्यात येणार असून त्यानंतर ३५ वर्षांहून अधिक वयोगटातील निरक्षरांचा विचार करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता ३५ वयापर्यंतच्या निरक्षरांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे प्रौढांच्या साक्षरतेवरच भर देण्यात येणार आहे.

स्वयंसेवकांवर भरही संपूर्ण योजना स्वयंसेवकांवर आधारित आहे. राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या, निवृत्त शिक्षक यांनी ही सेवा द्यावी, अशी अपेक्षा असून यातील कोणालाही मानधन देण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.राज्यातील जिल्हावार निरक्षर२०११ च्या जनणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या अहमदनगर २०,७०२, अकोला ६,२५०, अमरावती ९,४१८, छत्रपती संभाजीनगर १७,८३७, भंडारा ४,४२७, बीड १४,५८२, बुलढाणा ११,३२७, चंद्रपूर ९,३७४, धुळे ११,१५४, गडचिरोली ३७,२००, गोंदिया ४,८१७, हिंगोली ६,२५०, जळगाव १९,७९०, जालना ११,२८४, कोल्हापूर १५,४५०, लातूर ११,७६१, मुंबई शहर ८,२८९, मुंबई उपनगर २६,०४०, नागपूर १४,३२२, नांदेड १७,४४७, नंदूरबार ६८,८२०, नाशिक २८,२५३, परभणी १०,०२५, पुणे३३,३७५, रायगड १०,३७३, रत्नागिरी ६,३३६, सांगली ११,४५८, सातारा ११,४१४, सिंधुदुर्ग २,६९१, सोलापूर २१,३०९, ठाणे ४०,७९६, वर्धा ५,१२३, वाशिम ३१,६२०, यवतमाळ १२,३२६ आहेत.

निरक्षरतेची कारणे

  • कुटुंबातील गरिबी
  • रोजगारासाठी स्थलांतर
  • पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष
  • शैक्षणिक वातावरणाचा अभाव
  • शाळा जवळ नसल्याचा परिणाम
टॅग्स :kolhapurकोल्हापूरnandurbar-acनंदुरबारthaneठाणे