शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:18 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात प्रशस्त प्रशासकीय इमारतीचा अभाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क--सातारा : खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून गायब असलेले खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक साताऱ्यात आले. सुमारे पाच तास त्यांनी शहरात थांबून सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले. सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या तीन महिन्यांपासून उदयनराजे साताऱ्यातही फिरकले नाहीत. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांनी अचानक साताऱ्यात येऊन कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला. महामार्गावरून उदयनराजे शहरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. जलमंदिरवर गेल्यानंतर मातोश्री कल्पनाराजे भोसले यांची त्यांनी केवळ दहा मिनिटे भेट घेतली. त्यानंतर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान सातारा विकास आघाडीचे नगरसेवक यदू नारकर, अल्लाउद्दीन शेख, प्रशांत आहेरराव यांच्यासह अनेकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. बऱ्याच दिवसांतून उदयनराजे साताऱ्यात येत असल्यामुळे अनेकांना गहिवरून आले. अनेकजण त्यांच्या पाया पडत होते. लहान मुलेही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत होती. शहरातील बोळाबोळातून ते कार्यकर्त्यांसह सरसावत होते. ‘उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है,’अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. राजपथावरून कमानी हौद, गुरुवार बाग परत बसस्थानक तेथून राधिका रस्ता असा त्यांनी फेरफटका मारला. रात्री एकच्या सुमारास उदयनराजे पुण्याकडे निघून गेले. हीपोलिसांची ऐनवेळी पळापळ !खासदार उदयनराजे रात्री साडेनऊच्या सुमारास साताऱ्यात आले. नेमकी हीच वेळ पोलिसांची ड्यूटी करण्याची होती. त्यामुळे पोलिस कुमकही विखुरली गेली होती. उदयनराजे स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, पोलिसांच्या काहीच हालचाली दिसत नव्हत्या. ना पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्त ना शहरात. उदयनराजे मात्र कार्यकर्त्यांच्या गऱ्हाड्यात इकडून-तिकडे फिरत होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा पाहण्यासाठी रात्री अनेकजण घराबाहेर आले होते. काहींनी उदयनराजेंना भेटून आपल्या समस्या थोडक्यात सांगितल्या.नासीर शेख यांच्या घरीही भेट...उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी नगराध्यक्ष नासीर शेख यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या आघाडीमध्ये पालिका निवडणूक काळामध्ये प्रवेश केला होता. मात्र, तरीही उदयनराजेंनी झाले गेले विसरून शेख यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांच्या तसेच सातारकरांच्या भुवया उंचावल्या.