शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

मोरया.., कोल्हापुरात गणपती बाप्पाचे चैतन्यमय वातावरणात स्वागत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट

By संदीप आडनाईक | Updated: September 19, 2023 12:00 IST

वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी गणेशोत्सवाच्या जल्लोषाने सारे शहर व्यापून गेले

कोल्हापूर : मंगलमूर्ती मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात आज, मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. ढोल, ताशाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत लहान-थोर, मुली, महिलांनी चैतन्यमयी वातावरणात बाप्पाचे स्वागत केले.सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी कोल्हापुरातील कुंभार गल्ली, पापाची तिकटीचा परिसर गर्दीने भरून गेला आहे. गणपतीच्या आगमनासाठी शहरवासिय उत्साहाने सज्ज झाले आहेत. आरास, नैवेद्य, पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. प्रमूख मार्ग, चौक गर्दीने ओसंडून वाहू लागले आहेत. गणेशाच्या स्वागतादरम्यान पारंपारिक वाद्याच्या दणदणाटाने सारा परिसर दुमदूमून गेला. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी गणेशोत्सवाच्या जल्लोषाने सारे शहर व्यापून गेले आहे.दुचाकी, चारचाकी, रिक्षा,  हातगाडे, रथ यातून वाजत गाजत गणेश आगमन होत होते. चप्पल लाईन, दत्त गल्ली, पापाची तिकटी येथे वाहतूक कोंडी झाली होती. शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती. रंकाळा टॉवर, गंगावेश, फुलेवाडी रिंगरोड येथेही वाहतूक संथ गतीने होती. संध्याकाळी मंडळाच्या गणरायाचे आगमन होणार असल्याने डॉल्बी, वाद्य, लेसर शोचा झगमगाट दिसून येणार आहे. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

कळंब्यासह उपनगरात गणरायाचे उत्साहात आगमनअमर पाटीलकळंब्यासह लगतच्या राजलक्ष्मीनगर, साळोखेनगर,तपोवन, सुर्वेनगर, आपटेनगर, संभाजीनगर कळंबाजेल, रंकाळातलाव, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड, रायगड कॉलनी प्रभागात विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोलताशा, झानजपथक, बेंजो,टाळमृदुंगाच्या गजरात वाजतगाजत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका सुरु होत्या.बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड बाजारपेठेत मिठाईच्या दुकानात नैवेद्य खरेदीसाठी फळे, फुले, फटाके, रांगोळी, विद्युत रोषणाई साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. बाजारपेठेत यंदा उत्साह संचारल्याचे चित्र होते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजीखड्ड्यातुन आगमन उपनगरातील मुख्य रस्त्यांसह विविध कॉलनी अंतर्गत रस्त्यांची डागडुजी प्रशासनाने किमान गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक होते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यातुन झाल्याने भक्तवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर