शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोरओहोळ ओढ्यावरचा पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा मोरओहोळ ओढ्यावर असलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल पहाटे चारच्या दरम्यान कोसळला. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडझाला आहे. ही घटना पहाटेघडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. पूल कोसळल्याने परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा मोरओहोळ ओढ्यावर असलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल पहाटे चारच्या दरम्यान कोसळला. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडझाला आहे. ही घटना पहाटेघडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. पूल कोसळल्याने परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.सन १९९१ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने मिणचे-मोरेवाडी मार्गे गारगोटीला येणारा नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग म्हणून मोरेवाडी येथे मोरओहोळ ओढ्यावर हा पूल बांधला होता.या पुलाचे दगडी पिलर कमकुवत झाल्याने पात्रातील दोन पिलरपैकी मध्यभागी असलेला पिलर पडल्याने पुलाचा स्लॅब पात्रात कोसळला. पहाटे ही घटना घडल्याने कोणतीच जिवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मिणचे खोरी परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व प्रवासी वर्गास हा मार्ग सोयीस्कर होता. पण पूलच कोसळल्याने नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. कोसळलेल्या पुलाची लांबी ३० मीटर असून रुंदी १६ फूट आहे.या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ६ किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. या घटनेबाबत संबंधित अधिकाºयांकडे माहिती मागितली असता कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे पुढे आले.घटना घडल्याचे समजल्यानंतर भुदरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे दुपारी घटनास्थळी दाखल झाले. पडलेल्या पुलाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उपअभियंता एल. एस. जाधव, शाखा अभियंता डी. व्ही. कुंभार, जमादार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून पुढील उपाययोजना केल्या.दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, पूल कोसळणे ही बाब गंभीर आहे. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने या पुलासह तालुक्यातील इतर सर्व पुलांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.