शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्यातील मदरशांमध्ये झाली शिक्षणाची ‘पहाट’

By admin | Updated: February 15, 2016 01:11 IST

आशादायक चित्र : नियमित अभ्यासक्रमाचे धडे, सर्वांनाच मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये नियमित शिक्षणाची ‘पहाट’ झाली आहे. त्या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासनाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम शिकत आहेत. यंदाच इतक्या मोठ्या संख्येने मदरशांमधील मुले शिक्षणाकडे वळल्याने सकारात्मक पाऊल पडत असल्याचा अनुभव प्रशासनास आला आहे. सर्वच मदरशांमधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष बैठक बोलावली आहे. मदरसे कमी आणि प्रत्येक वर्षी बाहेर पडणारे विद्यार्थी अधिक आहेत. त्यामुळेच फक्त धार्मिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्वांनाच भविष्यात मदरशांमध्ये पूजाअर्चा, धार्मिक विधी करून चरितार्थ चालविता येईल, असे सध्याचे चित्र नाही. परिणामी केवळ धार्मिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता असते. नोकरी न मिळाल्यास त्यांना छोटे व्यवसाय आणि मिळेल तेथे कष्टाचे काम करून संसार करावा लागतो. परिणामी हयातभर कष्ट उपसले तरी आर्थिक उन्नती होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मुस्लिम समाजातील कुटुंबे इंग्रजी, मराठी माध्यमांचे शिक्षण पाल्यांना देत आहेत. तंत्रज्ञानाच्या जमान्यात मागे राहू नये याची जाणीव झाल्याने व शिक्षणाचे महत्त्व पटल्याने मदरशांमधील विद्यार्थीही धार्मिकसह नोकरी, रोजगाराभिमुख शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात एकूण १६ मदरसे आहेत. त्यामध्ये १२१९ मुले आणि ६६ मुली आहेत. त्यापैकी हातकणंगले तालुक्यातील दारूल उलूम (शिरोली), निजामिया (आळते), दारूल उलूम दअवतुल इस्लाम (निमशिरगाव), तर शिरोळ तालुक्यातील हजरत अबुहुरेरा रजिअल्ला (कुरुंदवाड) या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासकीय अभ्यासक्रम शिकत आहेत. याशिवाय इमदादूल इस्लाम, दारूल उलूम (आजरा) या मदरशांमधील १३० विद्यार्थी गणित, इंग्रजी, हिंदी, संगणक विषयांचे शिक्षण घेतात. यासाठी २० शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित मदरशांमधील विद्यार्थीही शिक्षक व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण प्रशासन सातत्याने पाठपुरावा करीत आहे.उर्दू माध्यमांच्या १६ शाळांत ३९०१ विद्यार्थीजिल्ह्यात पहिली ते १२वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण १६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३९०१ विद्यार्थी उर्दू शिक्षण घेत आहेत. कोल्हापूर शहरातील दोन शाळांत २७१ मुले आणि ४०३ मुली उर्दू माध्यमाचे शिक्षण घेत आहेत. शासनाचा नियमित अभ्यासक्रमच उर्दू माध्यमातून हे विद्यार्थी शिकत आहेत. यावरून मुस्लिम समाजही शिक्षणात अग्रेसर राहत आहे, हे स्पष्ट होते. कोणत्या मदरशांमध्ये किती मुले ?मदरसांनिहाय ६ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या कंसात अशी : आजरा तालुका - इंदादुल इस्लाम (४०), दारूल उलूम (३५), चंदगड - कासीमूल उलूम (१२५), नुराणी (६०), हातकणंगले -निजामिया, आळते (१२०), दारूल उलूम, शिरोली (२५०), दारूल उलूम दाउत्तुल इस्लाम मदरसा और स्कूल निमशिरगाव फाटा, तारदाळ (१७२), दारूल उलूम दाउत्तुल उस्मान, दावतनगर, कबनूर (४३), गौसिया, इचलकरंजी (४०), चॉँदतारा मर्कज, इचलकरंजी (५२), दारूल उलूम मुणुलिया, खोतवाडी (४०), शिरोळ-आरबिया जहरूल-उलूम, कुरुंदवाड (८८), जामिया खैरूल उलूम, उदगाव (११), जामिया हजरत आबुहुरैरा रजि. जामियानगर, कुरुंदवाड (७३), दारूल उलूम फैजाने गौसिया, आलास, शिरोळ (४०). कुरुंदवाडमधील मोमीन महद आइशा सिद्दिका या मदरशांत ६६ मुली आहेत. सर्वच मदरशांमधील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:हून काही मदरसे धार्मिकसह शासनाच्या अभ्यासक्रमातील शिक्षणही देत आहेत. - सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारीस्पर्धेच्या युगात सर्वच भाषिकांना आधुनिक शिक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे मदरशांमधील मुलेही राज्य, केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमाकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. मदरशांंमध्ये ई-लर्निंगसारखी शिक्षण प्रणाली वापरली जात आहे, ही आनंदाची बाब आहे.- आदिल फरास, माजी सभापती, स्थायी समिती, कोल्हापूर महापालिकां