शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठीवरील प्रेमापोटी मॉरिशसहून थेट कोल्हापुरात, पूर्वशा सखूने घेतला बी. ए.ला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 16:26 IST

मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे.

ठळक मुद्देमराठीवरील प्रेमापोटी मॉरिशसहून थेट कोल्हापुरात पूर्वशा सखूने घेतला बी. ए.ला प्रवेश

कोल्हापूर : मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे.‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ अशा शब्दांनी आपण मराठीचे गौरवगीत गातो; पण ज्ञान आणि संवादाची भाषा म्हणून इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, मॉरिशससारख्या देशात बहुसंख्य नागरिक हे मराठी भाषिक असल्याने तेथील शाळांमध्ये मराठी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. पूर्वशाचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मॉरिशसमध्ये स्थायिक झाले.तिचे वडील हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत; तर आई गृहिणी. तिचा जन्मही तिथेच झाला. क्रिओल ही तिथली मातृभाषा; याशिवाय इंग्रजी आणि फ्रेंचही बोलली जाते. पूर्वशाला शाळेत मराठीचे प्राथमिक धडे मिळाले; पण तिथे असलेली मराठीची मागणी आणि शिक्षकांचा अभाव यांचा विचार करून तिने मराठीत पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिच्या पालकांनी शिवाजी विद्यापीठाशी संपर्क साधला. येथे मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी तिला महावीर महाविद्यालयात प्रवेश घेण्याविषयी सुचविले.पूर्वशाने महावीर महाविद्यालयात जून २०१८ मध्ये बी. ए. भाग एकमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणासाठी तिला मॉरिशस सरकारने आफ्रिकन स्कॉलरशिप दिली आहे. तिचे शिक्षण, राहणे, खाणे आणि पॉकेटमनी हा सगळा खर्च मॉरिशस सरकारकडून केला जातो. इथे आल्यानंतर सुरुवातीला तिला मराठी समजायचे; पण बोलता येत नव्हते.

तिला चांगल्या पद्धतीने मराठी शिकता यावे यासाठी महाविद्यालयाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मराठी मुलींसोबत ठेवण्यात आले. महिन्यानंतर ती मराठी बोलायला शिकली. आता तर ती अस्खलित मराठी बोलू शकते. केवळ सात महिन्यांत तिने मराठी भाषा चांगल्या रीतीने आत्मसात केली आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर ती मॉरिशसला पुन्हा जाणार आहे. तिथे मराठीची शिक्षिका व्हायचे तिचे ध्येय आहे 

 

टॅग्स :marathiमराठीkolhapurकोल्हापूर