शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

शहरातील सात हजारांहून अधिक दुचाकी पूरबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:27 IST

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत अचानक आलेल्या पूर परिस्थितीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन सुरक्षित ठिकाणी नेता आले ...

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत अचानक आलेल्या पूर परिस्थितीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन सुरक्षित ठिकाणी नेता आले नाही. परिणामी, अशा वाहनधारकांना दुरुस्तीसाठी किमान १५०० ते १० हजारांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. यात केवळ विमा असलेल्या वाहनधारकांचा अपवाद वगळता इतरांनाही फटका बसणार आहे. यात सुमारे सात हजारांहून अधिक वाहनांचा समावेश आहे.शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क, जाधववाडी, रमणमळा, न्यू पॅलेसमागील परिसर, जाधववाडी, बापट कॅम्प, आदी परिसरात नागरिकांनी पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी वेळेअभावी सुरक्षित ठिकाणी नेण्यास अडचण झाली. त्यामुळे ती पुराच्या पाण्यात तशीच राहून गेली. परिणामी त्यांच्या दुरुस्तीशिवाय पर्याय राहिला नाही. बाधित झालेल्या दुचाकीकरिता किमान १५०० रुपये, तर जास्तीत जास्त १० हजारांहून अधिक खर्च येणार आहे. अशा वाहनधारकांना दिलासा देणारी बाब म्हणजे कोल्हापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे ५०० हून अधिक मेकॅनिक सदस्य जाग्यावर जाऊन दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरीही वाहनधारकांच्या परिस्थितीनुसार आकारली जात आहे.हे पार्ट बाधितपेट्रोल टाकी, स्विच, प्लग, कार्बोरेटर, सायलेन्सर, वायरिंग यांच्यावर परिणाम झाला तर केवळ १५०० रुपयांत दुरुस्त होण्याची शक्यता आहे, तर इंजिनच्या क्रँक बेअरिंग्जमध्ये पाणी गेले तर संपूर्ण इंजिन उतरावे लागणार आहे; यासाठी लागणारा खर्च किमान पाच हजारांच्या वर आहे. स्कूटर, मोपेडमध्ये अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅक्सिसमध्ये पाणी गेल्यास हाच खर्च १० हजारांच्या वर येत आहे; कारण या दुचाकींसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाºया आहेत.२५०० हून अधिक चारचाकी दुरुस्तीसाठी दाखलशहरासह औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चारचाकी वितरकांकडे पूरबाधित चारचाकींची संख्या अधिक आहे. विशिष्ट एका भागात एकाच कंपनीच्या सुमारे १२०० हून अधिक चारचाकी पाण्यात अडकल्या होत्या. अशा कंपन्यांनी ग्राहकाने फोन केल्यानंतर वाहने मोफत क्रेनद्वारे उचलून नेल्या, अशा ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ झाला. यात सुमारे सर्वच कंपन्यांच्या एकूण २५०० हून अधिक चारचाकी केवळ पाण्यात राहिल्याच्या कारणाने दुरुस्तीसाठी दाखल झाल्या आहेत.