शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कुराण पठणासह दानधर्मावर अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:46 IST

पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली असून, त्याकरिता बाजारात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल वाढली

कोल्हापूर : पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली असून, त्याकरिता बाजारात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल वाढली आहे. यात टोपी, अत्तर, ओढणी, रुमाल, खजूर यांचा समावेश आहे.

या पवित्र महिन्यात कुराणाचे पठण महत्त्वाचे मानले जाते. यासह गरजू मुस्लिम बांधवांना ‘जकात’च्या स्वरूपात दान हेही तितकेच महत्त्वाचे मानले आहे. त्यानुसार हे बांधव गरजू शेजारी, गल्लीतील, गावातील व अन्य धर्मीयांना कुवतीनुसार मिळणाºया उत्पन्नातून दान करतात. जर १०० रुपये मिळत असतील तर त्यांतील अडीच रुपये दान केले जातात. यासह ज्यांच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन्न किलो चांदी अथवा जादाची स्थावर मालमत्ता आहे, अशा मुस्लिम बांधवांनी गरजंूना जकात दिली पाहिजे, असा अलिखित नियम आहे. या काळात पवित्र महिन्यासाठी लागणाºया वस्तूंचीही रेलचेल मोठ्या प्रमाणात होते. देशी बनावटीसह परदेशीही वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कुराण, शरिफा, हादीस, तसबी, सुरमा, अत्तर, मिसवाक, टोपी, रिहाल यांचा यात समावेश आहे.या वस्तूंना मागणी अधिकटोपी - सूफी, अफगाणी, चायनीज, तैवानी, तुर्की, इंडोनेशियन, सुदानी, हकाणी.स्टोल (ओढणी) - डायमंड, नेट, चायना, कॉटन प्रिंटेड, जुगनू, मूनलाईट.अत्तर - यूएई, अमिरात, अल रिहाब, अल फलक, मीना, अल नईम, अलमास, आदी.रुमाल - अरबी रुमाल, गौंडा, झालर, टायगर रुमाल, मौलाना रुमाल, दुवा रुमाल, साफाह, आदी.कुराण - कुराण काब्याच्या आकर्षक पेटीच्या स्वरूपात आले असून, विविध आकारांनुसार ९५० ते १८०० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत.खजूर - अगदी साधे, जायदी, अफगाणी, आदी परदेशी खजुरांना मागणी अधिक आहे. त्यांच्या किमतीही ६० ते ५०० रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहेत.

दिवसभरात ३२ पाºयाचे एक किंवा दीड भाग वाचन करणेही गरजेचे मानले जाते.

कुराण, हादिस, तसबी, सुरमा, अत्तर, मिसवाक, टोपी, रिहाल या वस्तूंना मोठी मागणी आहे. यात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल बाजारपेठेत अधिक आहे. कुराणातही नवीन काब्याच्या आकारात कुराणपेट्या आल्या आहेत. त्यांनाही मागणी अधिक आहे.- महंमद मुल्ला, साहित्य विक्रेते