शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

इराणी खणीत २५०हून अधिक मूर्र्र्तींचे विसर्जन

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

विसर्जनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यातून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाचे एक अधिकारी, एक तांडेल व १० जवान तब्बल ३० तासांहून अधिक काळ लक्ष ठेवून होते.

कोल्हापूर : शहरातील मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील दुसऱ्या खणीत सुमारे अडीचशेहून अधिक मूर्तींचे कोणत्याही अडथळ््यांविना विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी खणीभोवती नागरिकांनी गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत मोठी गर्दी केली होती. ३० तासांहून अधिक काळ विसर्जन सुरू होते.इराणी खणीत गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून मूर्ती विसर्जनास प्रारंभ झाला. पहिल्या विसर्जनाची नोंद मंगळवार पेठेतील ‘बरसो रे, बरसो गु्रप’ची गणेशमूर्ती विसर्जनाची झाली. दरवर्षी विसर्जनातील वाढणाऱ्या मूर्तींची संख्या लक्षात घेऊन यंदा महापालिकेने चार तराफे व १०० हून अधिक कर्मचारी व स्वयंसेवक व्यवस्था केली होती. यासह खणीभोवती सुरक्षेसाठी लोखंडी जाळी मारली होती. विसर्जनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यातून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाचे एक अधिकारी, एक तांडेल व १० जवान तब्बल ३० तासांहून अधिक काळ लक्ष ठेवून होते. इराणी खणीसह नजीकच्या खणीतही मंडळांनी मूर्र्तींचे विसर्जन केले. या नव्या खणीत ११ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती विसर्जित केल्या जात होत्या. या दोन्ही खणींत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६२ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. त्यामध्ये २१ फुटांची एक, तर १५ फुटांच्या ४, १४ फुटांच्या दोन, ११ फुटांच्या ८, तर १० फुटांच्या १४ गणेशमूर्तींचा समावेश होता. कोटितीर्थ, पंचगंगा नदी, येथे दान करण्यात आलेल्या गणेशमूर्तीही या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या. त्यामध्ये गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता पूल गल्ली तालीम मंडळाची २१ फूट गणेशमूर्तीचा समावेश होता. या एकवीस फूटी मूर्तीनंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत एकही एकवीस फुटी गणेशमूर्तीचे विसर्जन झाले नव्हते. दुपारनंतर भगवा रक्षक (रविवार पेठ), न्यू चॅलेंज गु्रप (सम्राटनगर), सम्राट चौक तरुण मंडळ, शहीद भगतसिंह तरुण मंडळ, भगवा चौक तरुण मंडळ, श्रमिक युवा मित्र मंडळ, श्री मित्र मंडळ (शुक्रवार पेठ), उशिरा रात्री शिवाजी चौकाचा ‘महागणपती’चेही विसर्जन करण्यात आले. दरम्यान, विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांना क्रशर चौकात सतेज पाटील फौंडेशन व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यावतीने विविध मंडळांना मानाचे श्रीफळ देण्यात येत होते.साडेचारनंतर गर्दी दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश विसर्जनाचा वेग कमी होता. दुपारी चार वाजेपर्यंत लहान-मोठ्या १११ मूर्तींंचे विसर्जन झाले होते. पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत विसर्जनाचा वेग वाढला. रात्री आठ वाजेपर्यंत इराणी खणीत १८० व नव्या खणीत ३० मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. त्याच दरम्यान, या क्रशर चौक, इराणी खण या परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. विसर्जनासाठी महापालिकेने एक अग्निशमन दलाचा बंब एक जेसीबी, दोन हेवी क्रे न, एक रोडरोलर, बांधकाम, आरोग्य, सफाई आदी विभागांतील ६० हून अधिक कर्मचारी व स्वयंसेवक या खणींजवळ तैनात केले होते. त्यांच्यामार्फत मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मदत केली जात होती. पंचवीसहून अधिक पोलीस साध्या व गणवेशात पहारा देत होते. गेल्या सहा वर्षांत इराणी खण येथे विसर्जित करण्यात आलेल्या ३ ते २१ फूट मूर्तींचा आकडा वर्षमंडळांची संख्या २०१०२६०२०११२६१२०१२२८५२०१३३६६२०१४ २५०२०१५३५२