शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड नगराध्यक्षांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:02 IST

मुरगूड : येथील बाजारपेठेतील हुतात्मा स्मारकाच्या शेजारील विनापरवाना दुकान गाळ्याला विरोध का केला म्हणून मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट यांनी नगराध्यक्ष केबिनमध्येच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारचा निषेध करत पालिकेतील कर्मचाºयांनी नगराध्यक्ष जमादार यांची बाजू उचलून ...

मुरगूड : येथील बाजारपेठेतील हुतात्मा स्मारकाच्या शेजारील विनापरवाना दुकान गाळ्याला विरोध का केला म्हणून मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट यांनी नगराध्यक्ष केबिनमध्येच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारचा निषेध करत पालिकेतील कर्मचाºयांनी नगराध्यक्ष जमादार यांची बाजू उचलून धरत दुपारनंतर काम बंद आंदोलन केले. शिवीगाळ करणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाºयांनी निवेदनाद्वारे केली आहे.अधिक माहिती अशी, शहराची पाहणी करताना अधिकाºयांना बाजारपेठेमधील हुतात्मा स्मारकाच्या शेजारी भडगाव येथील भगवान दिनकर माने हे विनापरवाना दुकानगाळ्याचे काम सुरूअसल्याचे दिसले. स्मारकाचे पावित्र्य जपण्यासाठी स्मारकाच्या सभोवताली असणाºया टपºया, खोक्या बाजूला काढण्याच्या नोटिसा लागू केल्या असताना हा नवीन गाळा तिथे नको म्हणून अधिकाºयांनी आणि नगराध्यक्षांनी बांधकामास विरोध केला.दरम्यान, सदरचा दुकानगाळा घालणारा माने हा मंडलिक गटाचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला दुकानगाळा घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट, नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडे गेले. त्याठिकाणी त्यांनी जमादार यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न केला. पण जमादार आपल्या भूमिकेवर ठाम होते, आपण बेकायदेशीर काम करणार नाही, असे सांगताच येरुडकर आणि भाट हे दोघे धाऊन जमादार यांच्या अंगावर गेले. त्याठिकाणी असणाºया अन्य कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेत त्यांना रोखले. दरम्यान, ही माहिती कर्मचाºयांना समजताच सर्वजण नगराध्यक्षांच्या केबिनसमोर एकत्र आले. या घटनेचा निषेध करत सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले. शिवाय शिवीगाळ करणाºयांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले. आदींच्या सह्या आहेत. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.बेकायदेशीर काम करणार नाहीया स्मारकासाठी १३ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यातून त्याचे सुशोभीकरण सुरू आहे. त्यामुळे याच्या शेजारी अतिक्रमण करून खोकी घालू देणार नाही. या कामाला विरोध केला म्हणून येरुडकर आणि भाट यांनी आपल्याला शिवीगाळ करत अंगावर धावून आले. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींकडून असे वर्तन योग्य नाही. त्यामुळे काही झाले तरी शहराच्या भल्यासाठी आपण बेकायदेशीर काम करणार नाही. - राजेखान जमादार, नगराध्यक्ष