शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा ‘चंद्र’; धुळीतच ‘ईश्वर’

By admin | Updated: December 22, 2014 00:21 IST

सौंदर्य, वैभव लोपले : जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका रस्ता अद्यापही अपूर्ण, कचऱ्याची समस्या

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा तलाव जलपर्णी, सांडपाणी व ढासळणाऱ्या संरक्षक भिंतींमुळे अखेरची घटका मोजत आहे. टॉवर ते जुना वाशीनाका या रस्त्याचे काम गेली साडेपाच वर्षे सुरू आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पाचवीलाच पुजलेले आहे. ‘रंकाळ्याजवळ नाही, आम्ही कुठंतरी बाहेर वाळवंटातच राहतोय की काय, असं वाटतंय’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे. शहराच्या पश्चिम भागातील चंद्रेश्वर प्रभागाचा लेखाजोखा (क्र. ४८) ‘प्रतिबिंब’ या मालिकेतून मांडताना ‘लोकमत’ने घेतलेला कानोसा. दाटीवाटीचा आणि अस्सल कोल्हापुरी बाज असलेला प्रभाग म्हणून ‘चंद्रेश्वर’ परिचित आहे. अजूनही या प्रभागातील घरे जुन्या खापरीची आहेत. प्रत्येक घराचे एकमेकाला आढे... अन् एकमेकाला रात्री-अपरात्रीसुद्धा मदतीला धावून जाण्याची वृत्ती. या प्रभागाची रचना गोलाकृती आहे. प्रभागात बुवा चौक, मरगाई गल्ली, महाकाली भजनी व तालीम मंडळ, संध्यामठ गल्ली, उभा मारुती चौक, हनुमान देऊळ,बोंद्रे गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, वाणी गल्ली, नागोजीराव पाटणकर हायस्कूलचा परिसर, साकोली कॉर्नर, महाराष्ट्र सेवा मंडळ या परिसराचा समावेश होतो. प्रभागामध्ये मागील निवडणुकीत सहा हजार मतदारांची नोंद होती. नव्याने मतदार नोंदणीसाठी प्रभागाचे नगरसेवक परीक्षित पन्हाळकर प्रयत्नशील आहेत. प्रभागात घंटागाडी वेळेत येत नसल्याने कोपरा मिळाला की त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. प्रभागातील स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. नगरसेवकांच्या घरासमोरील पेव्हिंग ब्लॉक व्यवस्थित बसवले आहेत. बाकी सर्व ठिकाणांचे पेव्हिंग ब्लॉक तकलादू बसवल्याने ते निखळले आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. सन २०१० पासून जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका रस्ता विविध कामांमुळे अद्यापही अपूर्णच आहे. नागरिकांना या रस्त्यावरील धुळीमुळे घसा बसणे, घरात सातत्याने धुळीचे थर साचणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. संध्यामठसमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे काम तर तकलादू केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विद्यमान नगरसेवक : परीक्षित पन्हाळकरगतवेळचे मतदार : ६ हजारप्रमुख समस्या ४रस्त्याचे अपुर्ण काम, जागोजागी खड्डेच खड्डे४अवेळी येणारी घंटागाडी४अस्वच्छ स्वच्छतागृहे४उखडलेले पेव्हींग ब्लॉक४धुळीचे साम्राज्यविकासकामांचा दावा४जावळाचा गणपती ते वाशी नाका रस्ता कामाला मंजूरी४१० दिवसात रस्ता खुला होण्याची आशाचंद्रेश्वर प्रभाग हा दाट लोकवस्तीची आहे. जुन्या धाटणीचे गल्लीबोळ असल्याने या ठिकाणी कचरा गाडी येणे शक्य नाही. मात्र, दररोज घंटागाडी येणे अपेक्षित आहे. याशिवाय रंकाळा तलावातील ऐेतिहासिक संध्यामठाचेही जतन होणे अपेक्षित आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व मूलभूत सेवासुविधा मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून ही सर्व जबाबदारी नगरसेवकांची आहे. - स्वराज्य सरनाईक , नागरिक ग्ोल्या सहा वर्षांत खोदलेला जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करून नगरसेवकांनी नागरिकांचा दुवा घ्यावा. याचबरोबर रंकाळा तलाव स्वच्छ करून त्यातील जीवसृष्टी जगवावी आणि परिसरातील नागरिकांची दररोज येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका करावी.- अभिजित सरनाईक, नागरिकमहासभेत जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका हा रस्ता मंजूर झाला आहे. ‘एलबीटी’च्या माध्यमातून येणाऱ्या रकमेतून याचे काम केले जाणार आहे. याचबरोबर कचऱ्याच्या समस्येवर आणखी घंटागाड्या वाढविल्या जातील. प्रभागातील अनेक बोळांमध्ये रस्त्याऐवजी महापालिका नगरसेवक निधीतून पेव्हिंग ब्लॉक घालून दिले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत हा रस्ता पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाईल. - परीक्षित पन्हाळकर, नगरसेवक