राज्यातील महाविद्यालयातील महाडिबीटीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत आमदार राजू आवळे यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन मुंबई येथे मंत्री वडेट्टीवार भेट घेतली.
ऑनलाईन शिष्यवृत्तीसंदर्भात येत असलेल्या अडचणीची माहिती मंत्री वडेट्टीवार दिली.यावेळी त्यांनी महाडिबीटीमध्ये शिष्यवृत्ती अर्ज दाखल करताना अडचणी येत तक्रारी राज्यातून आल्याचे मान्य करून तत्काळ मागासवर्गीय विभागाचे प्रधान सचिव यांना विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत.
फोटो ओळ :
मुंबई : येथे सामाजिक न्याय मंत्री विजय वडेट्टीवार यांना महाविद्यालयातील ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज करण्यास महिना मुदतवाढ मिळावी, असे मागण्यांचे निवेदन देताना आमदार राजू आवळे यांनी दिले.