शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पाणलोटमध्ये पाण्याऐवजी पैसाच जिरवला

By admin | Updated: July 19, 2015 00:27 IST

सर्वच कामांवर संशयाचे ढग : यंत्रणा हडबडली ; गांभीर्याने विषय रेटणे आवश्यक

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षांत झालेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेली कामे व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसत असल्याने संपूर्ण कामावरच संशयाचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. या कार्यक्रमातून डोंगरमाथ्यावर पाणी जिरवण्या ऐवजी ठेकेदार, अधिकाऱ्यांनी आपल्या घरातच पैसा जिरवल्याचे सत्य बाहेर येत आहे. याची चौकशी सुरू असली, तरी किती गांभीर्याने विषय रेटला जाणार, यावरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. पाणलोटमधील भ्रष्टाचाराची चर्चा विधिमंडळात झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ‘पाणलोट’च्या कामातील भ्रष्टाचाराबाबत गेले दोन महिने रान उठविले. जलयुक्त शिवार अभियान, वसुंधरा पाणलोट विकास कामांमध्ये पर्यवेक्षक, ठेकेदारा व अधिकाऱ्यांनी तीस कोटींचा ढपला पाडल्याची तक्रार देवणे यांनी कृषी अधीक्षकांकडे केली होती. राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांत शेततळी, नालाबांध, जमीन सपाटीकरणाची अनेक कामे झाली. यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता, अंदाजपत्रक न करता व ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामे केली आहेत. काम कधी सुरू झाले आणि कधी संपले हेच ग्रामस्थांना कळले नसल्याने कामाबाबत तक्रारी सुरू झाल्या. जिल्ह्यात कामात अनियमितता असली, तरी भुदरगड, राधानगरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधिमंंडळात लावून धरल्याने हे प्रकरण धसास लागणार आहे. या कामांची चौकशी सुरू आहे; पण चौकशी अधिकारी किती गांभीर्याने त्याकडे बघणार, यावरच हा अहवाल अवलंबून असणार आहे. विधिमंडळात चर्चा झाल्याने गैरव्यवहाराचे प्रकरण चौकशी अधिकाऱ्यांसाठी सोपे राहिलेले नाही.