कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती.
यंदा खराब हवामानामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळेच एप्रिल मध्यावरही हापूसची आवक अपेक्षित नाही. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी चार हजार बॉक्स ५०-६० पेटींची आवक होते. आवक कमी असल्याने दर अद्यापही तेजीतच राहिले आहेत. त्यात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवारी हापूसची मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात हापूसचा बॉक्स सरासरी साडेपाचशे रुपयांना मिळत होता. मंगळवारी मात्र सरासरी सातशे रुपयांपर्यंत वाढ झाली होती. पेटीचा दरही तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचला. किरकोळ बाजारात बॉक्सची किंमत एक हजार रुपये झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चाट बसली.
बाजार समितीत मंगळवारी झालेली हापूस आंब्याची आवक
आंबा आवक दर
हापूस ४५ पेटी १,५०० ते ३,०००
हापूस ४५३० बॉक्स २०० ते १,२००
पायरी ६५ बॉक्स ३०० ते ३२०
लालबाग ४५० बॉक्स १०० ते २५०
फोटो ओळी :
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याच्या खरेदीसाठी मंगळवारी कोल्हापुरात गर्दी झाली होती. (छाया : नसीर अत्तार)
(फोटो-१३०४२०२१-कोल-मँगो)