शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चिमुकल्यांना मिळाली मायेची ऊब

By admin | Updated: November 17, 2014 00:23 IST

कपडे संकलन मोहीम : ‘अवनि’ सरसावली --०इनिशिएटिव्ह

कोल्हापूर : शहरातील झोपड्यांमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मांडल्यानंतर कोल्हापूरकरांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आज, रविवारी पेठवडगाव, शिंगणापूर, रुईकर कॉलनी, फुलेवाडी, आदी परिसरांतील नागरिकांनी भेटून आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून मदत देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. या चिमुकल्यांच्या मदतीसाठी ‘अवनि’ संस्था सरसावली आहे. वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यादवनगर-डवरी वसाहत, विचारेमाळ, संभाजीनगर पेट्रोल पंपामागील वसाहत, वारे वसाहत, मुडशिंगीच्या माळावरील झोपडपट्टी, आदी वसाहतींमध्ये उघड्यावर आयुष्य जगणाऱ्या कुटुंबांना आपण सर्वांनी मिळून मदतीचा हात दिला, तर झोपड्यांमध्ये कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांना माणुसकीची ऊब मिळेल, असे आवाहन ‘लोकमत’ने केल्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. आज, शिंगणापूर येथील सराफ व्यावसायिक जयसिंग संकपाळ, देवकर पाणंद येथील मानसी कुलकर्णी, जुनी मोरे कॉलनीतील मनीषा पाटील, रुईकर कॉलनीतील संजीवनी सूर्यवंशी, फुलेवाडीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी राजबन्सी माने, पेठवडगावमधील प्रकाश पेटकर यांच्यासह अनेकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून मदत देणार असल्याचे सांगितले. अजूनही मदत करावयाची असेल, तर त्यांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ ९९२२४३८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.