शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर-सांगलीतील महापूर रोखण्यासाठी नद्यांच्या संगम ठिकाणांत बदल; भोगावती, कृष्णेचा समावेश

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 16, 2024 14:02 IST

पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी रुपये लागणार

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी भोगावतीचे पाणी बाेगद्याद्वारे दुधगंगा नदीत वळवणे, राजाराम बंधारा व सांगलीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बदलून येथे बलून (फुगा) प्रकारातील बंधारा तयार करणे, पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नद्या तसेच पंचगंगा व व कृष्णा नदीच्या संगमाचे क्षेत्र बदल अशा महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येणार असून त्या उपाययोजनांचे सादरीकरण बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले. त्यामध्ये वरील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो. भोगावती आणि कासारीचा संगम प्रयाग चिखली येथे आहे. बहिरेश्वर येथील कुंभी, भोगावती यांचा संगम आणि बीडशेड येथे तुळशी आणि भोगावतीचा संगम आहे या संगमाचे क्षेत्र बदलणे प्रस्तावित आहे. यासह विविध उपाययोजनांसाठी काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी रुपये लागणार आहेत.

अन्य उपाययोजना

  • राधानगरी धरणाच्या स्पिलवेचे नूतनीकरण, रेडियल गेट्सने बदलले, सर्व्हिस गेटसची दुरुस्ती
  • नदीपात्रातील तळातील गाळ काढून योग्य दिशेने पाणी प्रवाहित करणे,
  • नदीचा क्रॉस सेक्शन चांगल्या स्थितीत आणणे.
  • पुलांसह प्रवाहातील वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणे
  • मलबा हटवणे आणि नदीचे पुनर्विभागीकरण करणे.

बलून बंधारे..कोल्हापुरातील राजाराम बंधारा आणि पुढे सांगलीत आयर्वीन पूल व डिग्रज येथे बलून पद्धतीचे बंधारे प्रस्तावित आहे. पंचगंगा नदी ते शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुकडी, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि कुरुंदवाड येथील ९ के.टी.च्या ८१ किमी लांबीच्या बाजूने बांधलेल्या तारा पाण्याच्या प्रवाहात अडथळे बनत असून येथे हे बलून प्रकार बंधारा प्रस्तावित असून त्यासाठी २०० कोटी निधी लागणार आहे.

भोगावती दुधगंगा बोगदा

राधानगरी धरणातील विसर्ग भोगावतीतून जातो त्यामुळे पंचगंगा नदीला पूर येतो हा विसर्ग भोगावती नदीतून दुधगंगेकडे वळविण्यात येणार आहे. करंजफेण गावाजवळ राधानगरी धरणाच्या खालच्या दिशेने नरतवडेपर्यंत ५५७ मीटरचा बोगदा प्रस्तावित आहे. बोगद्याची लांबी ६.३ किलोमीटर व व्यास १५ मीटरचा आहे. यामुळे पुराच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे.

सांगलीतील पूरनियंत्रण उपाययोजना

  • टेंभू (कराड) आणि के. टी. वीर राजापूर येथील कृष्णा नदीतील गाळ काढून नदीचे पात्र खोल करणे.
  • सांगली शहर पाणी पुरवठ्यासाठीची योजना बदलणे व बॅरेज बांधणे
  • सांगली, मिरज, कुपवाडमधील पूरग्रस्त २५०० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन
  • नदी पुनर्विभागासाठी दोन्ही काठावर ५०० हेक्टर जमिनीचे संपादन
  • कृष्णा नदी काठाची पुनर्बांधणी, संरक्षण व बळकटीकरण.
  • उतारावर गवत (टर्फिंग) लावणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर